मेडिकल बिलासाठी लाचेची मागणी पुन्हा पुन्हा केली!!
लाच लुचपत विभागाने चांगलीच अद्दल घडवली!!!
लातूर (एल.पी. उगीले) : पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे वरिष्ठ लिपिक (वर्ग तीन) म्हणून नेमणुकीस असलेल्या कल्याणी जितेंद्र सोनवणे या 41 वर्षीय महिला कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे तक्रारदार यांच्या पत्नीचे मेडिकल बिलाचे मागील वर्षीची फाईल मंजूर करून पुढे पाठवण्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपये, तसेच जानेवारी महिन्यात मंजुरीसाठी दाखल केलेल्या इतर तीन मेडिकल बिलाच्या फायली कोणत्याही त्रुटी शिवाय जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय लातूर येथे पाठविण्यासाठी व बिल मंजूर करण्यासाठी 22 हजार रुपये असे एकूण 24 हजार रुपयांची पंचा समक्ष मागणी केली. लागलीच पंचासह लाच मागणी केलेली रक्कम तक्रारदार यांनी कल्याणी सोनवणे यांना देण्यासाठी गेले असता, आरोपी लोकसेवक महिला क्लर्क सोनवणे यांना तक्रारदाराचा संशय आल्याने, त्यांनी जाणीवपूर्वक लाचेची मागणी स्वीकारण्यास टाळाटाळ केली. आज पुन्हा लाच मागणी केलेली रक्कम देण्यासाठी तक्रारदार गेले असता, कल्याणी सोनवणे यांनी पुनश्चर लाचेची मागणी केली. मात्र पुन्हा संशय आल्याने लाच स्वीकारण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. या कारवाईच्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी लोकसेवक वरिष्ठ लिपिक कल्याणी सोनवणे यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मार्गदर्शक म्हणून पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र डॉक्टर राजकुमार शिंदे, लाच रुचवत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण, तसेच पर्यवेक्षकीय अधिकारी पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक पोलीस निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूरचे भास्कर पुल्ली आणि त्यांचे पथक यांनी हा सापळा लावला होता. दोन वेळा लोकसेवक आरोपी महिला क्लर्क यांनी वैद्यकीय बिलाच्या मंजुरीसाठी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे बिल सादर करण्यासाठी लाचेची मागणी केली. याची पुष्टी झाल्याने, लासलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी ईसम,दलाल यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या शुल्काव्यतिरिक्त अन्य रकमेची लाच म्हणून मागणी केली असल्यास, तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवावी. जेणेकरून यासंदर्भात योग्य ती कारवाई करता येईल. असे आवाहन पंडित रेजितवाड यांनी केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात देखील अशा पद्धतीची प्रवृत्ती बळावर चालल्यामुळे पोलीस कर्मचारी परेशान झाले आहेत. अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली