छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणुकीतून जीवनाला आधार मिळतो – माजी गृहराज्यमंत्री आ. संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : आपला महाराष्ट्र देशात सर्वात प्रगत आहे, त्याचबरोबर पुरोगामी विचारांचा असुन सर्व क्षेत्रात महाराष्ट्र सर्वप्रथम असल्याचे दिसते. याचे कारण म्हणजे या सर्वांची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी घातली होती. नैतिकता काय असते? हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले, स्त्रियांचा सन्मान कसा करायचा? याचा धडा सगळ्यात अगोदर जर आपल्याला कोणी शिकवला असेल तर ते आपले छत्रपती शिवाजी महाराज होते. म्हणून आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवल्यास जीवनात आपल्याला कधीही अपयश येणार नसल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी केले.
ते उदगीर शहरातील विद्यावर्धिनी हायस्कूल येथे आयोजित सार्वजनिक शिवजयंती महोत्सव 2023 च्या शिव सप्ताहाचे उद्घाटन व व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदगीर तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजीराव मुळे, डॉ.विद्यासागर आचवले, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष नामदेवराव चामले, सहसचिव माधवराव पाटील, सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष अजित पाटील तोंडचिरकर, तहसीलदार रामेश्वर गोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पाटील, विशाल पाटील शिरोळकर, प्रा. गोपाळकृष्ण घोडके, प्रा. श्याम डावळे, प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव, प्रा. राजकुमार मस्के, प्रा. विवेक सुकणे, रामभाऊ हाडोळे, डॉ. मोहिनी आचोले, व्यंकटराव पाटील अवकोंडेकर, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष गजानन सताळकर, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम,संतोष बिरादार, नवनाथ गायकवाड, धनाजी बनसोडे, प्रदीप ढगे, सर्जेराव भांगे, अनिल मुदाळे, विराज पाटील, मनोज कनाडे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, आपल्या जीवनात छत्रपतीच्या चारित्र्याचा अभ्यास करणे गरजेचे ज्यामध्ये अपल्याला महाराजांकडे शौर्य, धैर्य , साहस, निष्ठा, पराक्रम, देशप्रेम, निष्कलंक चारित्र्य अशा अनेक गुणांनी भरलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चारित्र्य आपल्याला जगण्याची प्रेरणा देते. आदर्श जीवन कसे असावे व ते कसं जगावं याचा धडा आपल्याला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यातून मिळतो. कारण मानव जातीला 5000 वर्षाचा इतिहास आहे, आणि आपल्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एकही राजा झाला नाही. महाराष्ट्राचा मान आणि स्वाभिमान हे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे.
शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना आ. संजय बनसोडे यांनी आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ट्रिपल ए चा फॉर्मुला अवलंबला पाहिजे असे सांगून ट्रिपल ए म्हणजे उद्देश, दृष्टिकोन आणि कृती याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यामध्ये आपल्या ध्येयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा पाॅझिटिव्ह असला पाहिजे, व आपले जे ध्येय आहे ते आपण आपल्या कृतीतून दाखवून द्यावे लागेल, मगच आपण यश संपादन करु शकतो. असा कानमंत्र विद्यार्थ्यांना देऊन आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी या त्रिसूत्रीचा अवलंब करावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमास उषा बिराजदार, गोपाळ पाटील, सतीश पाटील, राजेश चव्हाण, बाबासाहेब सूर्यवंशी , राहुल अतनुरे, महेश पाटोदेकर, माध्यमिकचे मुख्याध्यापक बाबुराव नागरवाड, प्राथमिकचे मुख्याध्यापक प्रदीप आजणे, इंग्रजी माध्यमिकच्या मुख्याध्यापिका सुप्रिया जाधव, विजयकुमार भांगे, मनीषा पाटील, सतीश पाटील पिपळगावकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव जाधव व प्राजक्ता पाटील यांनी केले. या कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी, शिक्षक – शिक्षिका व शिवप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.