आखेर आज ग्रामसेवक रुजू झाला

आखेर आज ग्रामसेवक रुजू झाला

पोलीस फ्लॅश न्यूज इफेक्ट

वाढवणा बु(हुकूमत शेख) : उदगीर तालुक्यातील सर्वात महत्वाचे व जास्त लोकसंख्येचे गाव व 17 सदस्य असलेली ग्रामपंचायत असुन ग्रामसेवक बब्रुवान पाटील नवीन असताना कार्यालयात दररोज येत होते, मात्र एक दोन महिन्यानंतर काय जादु झाली माहिती नाही. गावातील कोणत्याच समस्या कडे त्यांचे लक्ष नव्हते. ग्रामपंचायतच्या अगदी जवळच हाकेच्या अंतरावर शाळा असुन तेथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच गावात अनेक ठिकाणी व्हॉल्व लिकेज तसेच मेन रस्त्यावर मेन पाईप लिकेज होऊन रस्त्यावर पाणी वाया जात असताना देखील व गावातील नाल्या देखील साफ साफसफाई केली नसल्यामुळे गावातील ग्रामस्थ गावात ग्रामपंचायत आहे की नाही? अशी चर्चा करत असताना आमचे वाढवणा प्रतिनिधी हुकूमत शेख यांनी गावातील जनतेच्या समस्या बद्दल पोलीस फ्लॅश न्यूज या वर्तपत्रात दि.11 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक येत नसल्यामुळे गावात अनेक समस्या या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच कर्तव्य दक्ष मुख्यकार्यकारी अधिकारी लातुरचे अभिनव गोयल व उदगीर तालुक्याचे गटविकास अधिकारी यांनी आमचे प्रतिनिधी हुकूमत शेख यांच्या (सोशलमीडियावर )व्हाट्सअपवर मॅसेज टाकला होता, सोमवार पासुन ग्रामसेवक रेगुलर येईल. असा शब्द दिला होता तो शब्द पाळत त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात (जुनेच )सर्वांचे परिचयाचे ग्रामसेवक अरविंद शिंदे दि.13 फेब्रुवारी रोजी वाढवणा(बु) ग्रामपंचायत कार्यलयात रुजू झाले. त्यांचा हार घालुन सत्कार देखील करण्यात आला. या वेळी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ हजर होते. आता सर्व समस्यांचा निपटारा करण्याचे काम ग्रामसेवक अरविंद शिंदे करतील, मात्र ग्रामस्थांनी आपाआपल्या स्वखुशीने घर पट्टी, नळ पट्टी, भरून ग्रामपंचायतला सहकार्य करा, तुमच्याच गावातील समस्या तुमच्याच कर भरणाने पुर्ण करता येतील म्हणुन विनंती करतो. तुम्ही कर भरणा महिन्याला महिना करा म्हणजे समस्या सोडवता येतील. असे आवाहन ग्रामसेवक अरविंद शिंदे यांनी केले आहे. पोलीस फ्लॅश न्यूज वृत्तपत्राने आमच्या गावातील समस्या शासन, प्रशासना पर्यंत पोहचवून ग्रामपंचायतला ग्रामसेवक मिळवून दिल्या बद्दल वाचकानी संपादक व निर्भीड लिखाण करून न्याय मिळवून देणारे वाढवणा प्रतिनिधी हुकूमत शेख व गोरगरिबांच्या आलेल्या समस्याची निर्भीड पणे दखल घेत अहोरात्र लेखनीतून ग्रामस्थांच्या रंजलेल्या, गांजलेल्या लोकांना न्याय मिळवून देणारे व शासन प्रशासनास जागृत करण्यासाठी कर्दनकाळ बनून लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्यास भाग पडणारे कार्यकारी संपादक एल. पी. उगिले यांचे वाचकातर्फे अभिनंदन व कौतुक होत आहे.

About The Author