पोलीस निरीक्षक पवार यांचा सत्कार

पोलीस निरीक्षक पवार यांचा सत्कार

उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन साठी नूतन पोलीस निरीक्षक अरविंद पवार हे नुकतेच रुजू झाले आहेत. त्यांचे स्वागत आणि सत्कार पोलीस मित्र संघटनेच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा पोलीस मित्र अभिजीत औटे महिला दक्षता समितीच्या सदस्य दिपाली औटे, संगीता नेत्रगावे, चंचला हुगे, पोलीस मित्र शेख मोहम्मद, रतिकांत घोगरे, सय्यद सलीम, विनोद पदमगिरवार, लाईक खान, मेहमूद मुल्ला इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन साठी ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी जवळपास तीन वर्ष चांगले काम केले. प्रशासकीय कार्यप्रणालीनुसार त्यांची लातूर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अरविंद पवार हे रुजू झाले आहेत. अवैध धंदे बंद करण्याची घोषणा त्यांनी रुजू होताच केली आहे. त्यामुळे भविष्यात उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातून कायदा सुव्यवस्थेचा आणि शांततेचा सन्मान केला जाईल. अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

About The Author

error: Content is protected !!