जवाब दो आंदोलनाला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे – जितेशभाऊ रणदिवे(विळेगावकर)यांचे आवाहन
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : २२ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई आझाद मैदान येथे सकल मातंग समाजाच्या वतीने जवाब दो आंदोलन होणार आहे,तरी या ऐतिहासिक आंदोलनाला लाखोंच्या संख्येने उपस्थित व्हा,असे आवाहन जितेश भाऊ रणदिवे (विळेगावकर) यांनी सकल मातंग समाजाला केले आहे. हे आंदोलन कोण्या संघटनेचे नाही,कोणत्या राजकिय पक्षाचे नाही,किंवा कोणत्या एका व्यक्तीपुरते मर्यादित नाही, तर हे आंदोलन सकल मातंग समाजाचा आहे. मग तो डॉक्टर असेल,इंजिनर असेल,वकील असेल,शासकीय अधिकारी असेल,खासगी कर्मचारी असेल,शेतकरी असेल,मजुरवर्ग असेल,प्रौढ असेल,युवा असेल,स्त्री असेल, पुरुष असेल जर का तो मातंग समाजाचा किंवा इतर बाकी अनुसूचित जातीतील अनेक जाती पैकी असेल त्या सर्वांच्या हक्क व अधिकारासाठी त्या सर्वांच्या हितासाठी हे आंदोलन आहे, या आंदोलनाचे एकच वैशिष्ट आहे,ते म्हणजे आमच्या हक्काचा वाटा आम्हाला भेटला पाहिजे, ते आम्ही सर्वजण मिळवून घेणार.या आंदोलनाच्या प्रामुख्याने मुख्य मागण्या अशाआहेत,अ, ब ,क, ड वर्गवारी आरक्षण,बार्टी संस्थानात आर्टी ची स्थापना,अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पदवी देण्यात यावी.आद्यक्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवे यांना महापुरुष्यांच्या यादीत समाविष्ठ करण्यात यावे.अट्रोसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा.या प्रमुख मागण्या घेऊन सकल मातंग समाज या आंदोलनात सहभाग नोंदवनार आहे. भावी पिढ्याच्या उद्धारासाठी या ऐतिहासिक जवाब दो आंदोलनाला उपस्थित राहून नवीन बनणाऱ्या इतिहासाचे साक्षीदार व्हा असे आवाहन जितेश भाऊ रणदिवे(विळेगावकर) यांनी सकल मातंग समाजाला केले आहे.