उदयगिरीत जिल्हास्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक जिल्हास्तरीय सबज्युनिअर मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धा 8,10,12 वर्षाखालील मुले व मुले या तीन गटात घेण्यात आल्या. तीन गटातील एकूण 30 क्रीडा प्रकारात स्पर्धा घेण्यात आल्या.
उद्घाटन सत्राच्या वेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम संदीकर, संघटनेचे सहसचिव निजाम शेख उपस्थित होते. या स्पर्धेत 128 मुले व 85 मुलींनी सहभाग नोंदवला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी 38 पंच व स्वयंसेवक उपस्थित होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी म.ए.सोसायटीचे सहसचिव डॉ.रामप्रसाद लखोटिया, प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, डॉ.प्रवीण मुंदडा यांची उपस्थिती होती. या स्पर्धेमध्ये विजयी खेळाडूंना सुवर्ण, रौप्य व कास्य असे एकूण 162 पदक वितरण करण्यात आले. तसेच आयोजकाच्या वतीने विशेष प्राविण्य प्रमाणपत्रही देण्यात आले. या स्पर्धेसाठी महेश हुलसुरे, किरण सनगले, ऑलम्पिक स्पोर्ट क्लब, उदगीर यांनी प्रायोजकत्व स्वीकारले होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सचिव ॲड.विक्रम संकाये, कार्याध्यक्ष प्रा.विश्वनाथ हुडगे यांनी वेळोवेळी सर्वांना मार्गदर्शन केले. पंच व स्वयंसेवक म्हणून प्रा.रोहन एनाडले, डॉ.शिवानंद पाटील, प्रा.सचिन चौधरी, लक्ष्मण सोनकांबळे, वीरसागर काळे, रमेश सूर्यवंशी, तुळशीदास पोतने, सावन जाधव, प्रा.संजय बीबीनवरे, अंकित जाधव, विशाल जाधव, फड नामदेव, मारुती बिरादार, शुभम मोतीपवळे, मंगेश धोत्रे, हंसराज ढगे, बिरादार आकाश, मोतीपवळे सुशांत, पंकज फड, नारायण शेळके, एस.चव्हाण, वाघमारे सचिन, पंढरीनाथ तेली यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक प्रा.सतीश मुंढे यांनी तर आभार प्रा.सचिन चामले यांनी मानले.