देवणी शहरात शिवजयंती मोठ्या उत्सहात साजरी
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी देवणी शहरातील विवेक वर्धनी महाविद्यालयात संस्थापक सचिव भगवानराव पाटील तळेगावकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी तहसीलदार सुरेश घोळवे, पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, गुरूलिंगेश्वर मठाचे मठाधिपती सिद्धलींग महास्वामी, भाजपाचे ज्येष्ठ नेते हावगिराव पाटील, मनोहर पटणे, बाबुराव इंगोले, काशिनाथ गरीबे,गोपीनाथ सगर, वाघबर कांबळे, नगराध्यक्ष कीर्तीताई घोरपडे, सौ कुशावरताताई बेळे, व्यंकटराव पाटील, वैजनाथ अस्टुरे, शंकर पाटील ,शहाजी पाटील, चेअरमन अविनाश पाटील,बसवराज पाटील, गोविंद मोदी, जाफर मोमीन,जावेद तांबोळी, उमाकांत बर्गे,मनोहर पाटील, रमेश कांबळे,विठ्ठल शिंगडे, ओमकार धनुरे ,अंकुश गायकवाड, अमर पाटील, अनिल कांबळे, किशोर निडवंचे, वसंत कांबळे, यांच्यासह देवणी तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती.
यावेळी देवणी शहरातून शिवाजी महाराजांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली, या मिरवणुकीत देवणी शहरातील सर्व शाळांनी सहभाग नोंदविला होता.यावेळी या मिरवणुकीत अनेक कलापथकानी विविध देखावे साजरे केले होते, मिरवणुकीचा समारोप विवेक वर्धनी शाळेमध्ये करण्यात आला. यावेळी तालुक्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी मोठा पोलिस बदोबस्त ठेवला होता.