लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत व स्फुर्तीस्थान, मराठी स्वराज्याचे संस्थापक,संस्कृतीचे रक्षणकर्ते,थोर सेनानी, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे तर, प्रमुख वक्ते म्हणून माधव केंद्रे, विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व ज्येष्ठ शिक्षिका सौ.आशालता कल्लूरकरबाई उपस्थित होत्या.मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.शाळेच्या वतीने मान्यवर पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
प्रमुख वक्ते माधव केंद्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी,राजमुद्रा, गनिमीकावा,घटनाक्रम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.शिवाजी महाराज हे सर्व हिंदुस्थानचे स्फुर्तीस्थान आहेत.सर्वांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून,आपले आचरण ठेवले पाहिजे,असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे.शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले.आपणही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन शाळेचा लौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करावा,असे आवाहन केले.सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सौ.सोनिया देशपांडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.