महात्मा फुले परिवाराच्या शिवजयंतीने शहराचे लक्ष वेधले

महात्मा फुले परिवाराच्या शिवजयंतीने शहराचे लक्ष वेधले

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले परिवाराच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ जयंती आकर्षक विविध देखाव्यातून राष्ट्रीय एकात्मता,थोर समाजसुधारक, लोककलावंत, ढोल ताश्यांचा निनाद,रथातील छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तसेच लक्ष्यवेधी लेझीम पथके, विविध नृत्ये, अश्वदल, आदिंसह मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले परिवाराच्या प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने अहमदपूर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली या रॅली अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्यासह भारतमाता व महापुरुषांची देखावे तसेच समाज प्रबोधन पर देखावे पटनाट्याच्या माध्यमातून मिरवणुकी दरम्यान काढण्यात आली. यावेळी शिवजयंती समारंभाचे अध्यक्ष व किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डी. आर . झोडगे हे होते तर प्रमुख उपस्थितीत माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी मंत्री विनायकराव पाटील, दिलीपराव देशमुख, डॉ. गणेश कदम, शिवानंद हिंगणे, दिलीपराव देशमुख, भारत चामे, अमित रेड्डी, नगरसेवक बालाजी आगलावे बॉक्सर, मीनाक्षी शिंगडे, डॉ. गणेश कदम, डॉ. सय्यद अकबर लाला, चंद्रकांत मद्दे यांच्यासह विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन तसेच अहमदपूरवासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाटील गल्लीत मान्यवरांचा सत्कार शिवजयंती निमित्त महात्मा फुले परिवाराच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे मिरवणुकीतील असंख्य मावळे व विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने थंड पेयाची सोय केली, तर सराफा व्यापाऱ्यांनी स्वादिष्ट अल्पोपहार दिला. अहमदपूर वासियांनी जागोजागी सुविधा देऊन शिवजयंती साजरी केली.

शहरातील पाटील गल्लीत प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, मुख्याध्यापक बी. आर. काबरा, मुख्याध्यापक भागवत मुसने, डॉ.पी. डी.चिलगर, डॉ. सतीश ससाणे, प्रो.डॉ. अभिजीत मोरे, प्रा. दत्ता गलाले, पी. एस. माने यांचा पाटील गल्लीचे मानकरी बालासाहेब पाटील, मुकेश पाटील, दयानंद पाटील, किरण पाटील, आदिनाथ पाटील, राम पाटील,अक्षय पाटील, दिनेश पाटील, संगम पाटील आदींनी सत्कार करून मिरवणुकीस शुभेच्छा दिल्या. यावेळी छत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. गणपतराव माने व ज्येष्ठ शिक्षक दत्तात्रय उगिले यांना महात्मा फुले परिवाराच्या वतीने महात्मा फुले भूषण म्हणून गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बी.आर.काबरा तर सूत्रसंचालन पी.एस. माने यानी तर आभार डॉ. बब्रुवान मोरे यांनी मानले. मान्यवरांचा सत्कार प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, मुख्याध्यापक भागवत मुसने यांच्यासह महात्मा फुले प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक,प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author