संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका आशा रोडगे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे परमेश्वर तिडके,संतोष गोरे,गुरूदेव पेड,लोहकरे, सतीश साबणे, शबाना शेख ,सविता पाटील ,त्रिगुणा मोरगे ,संजीवनी गुरुमे, संगीता आबंदे ,अर्चना जांभळदरे, सुजाता बुर्गे ,बब्रुवान कलाले, पद्माकर नळगिरे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व महिला पालक उपस्थित होते. यावेळी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून जय जय महाराष्ट्र माझा या राज्य गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.

यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे परमेश्वर तिडके व गुरूदेव पेड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.शाळेतील उपक्रमांचे, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. प्रारंभी वेशभूषेसह जान्हवी डांगे,अनुष्का जाधव यांनी शिवाजी महाराजांच्या पोवाड्याचे सादरीकरण करून 82 विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांविषयी मनोगते व्यक्त केली. ज्ञानेश्वरी सूर्यवंशी या विद्यार्थिनीने शिवरायांच्या जीवनावर प्रकाश टाकला.पियुष गुंडीले, परिणिती तिडके, किमया माने, स्वरा गौंड यांनी नाटक सादर केले. अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शबाना शेख यांनी केले. सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी तर आभार सहशिक्षका त्रिगुणा मोरगे यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author