मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन 24 कोटी 7 लाख 50 हजार रुपयाचा निधी मंजूर – माजी मंत्री आ.संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर जळकोट मतदार संघातील अनेक गावे गेल्या कित्येक वर्षापासून रस्त्यापासुन वंचित होते. त्यामुळे तेथील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती, काही रस्त्यांची दुर्दशा झाल्यामुळे अपघात होत होते. ही बाब माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून अनेक वाडी, तांडे व गावे जे विकासापासून दूर होते, त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्नशील होते. गेल्या कित्येक वर्षात अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले पण छोट्या गावात व वाडी तांड्यावर कोणीच लक्ष दिले नव्हते. मतदार संघातील एका एका गावात पन्नास पन्नास वेळेस आ.बनसोडे जातात, म्हणून त्यांना प्रत्येकाची अडचण माहित असल्याने त्यांनी ज्या गावाला रस्ता नाही अशा गावासाठी शासनाकडे पाठपुरावा करत होते, त्यांच्या या मागणीला यश आले असल्याने सर्वसामान्य नागरिकांतुन त्यांचे अभिनंदन होत आहे.
या कामात प्रामुख्याने निधी उपलब्ध झाला मोघा ते रावणगाव या 7.49 कि.मी.च्या रस्त्यासाठी 6 कोटी 24 लाख 48 हजार रु, क्षेत्रफळ ते हंगरगा या 6.35 किमी रस्त्यासाठी 5 कोटी 72 लाख 99 हजार , राज्य मार्ग 268 ते डांगेवाडी 3.40 किमी रस्त्यासाठी 2 कोटी 63 लाख 15 हजार, राष्ट्रीय महामार्ग 63 ते चवळी तांडा व मलकापूर ते मलकापूर तांडा या 3.60 किमी रस्त्यासाठी 3 कोटी 4 लाख 76 रुपये, जळकोट तालुक्यातील ओडीआर 54 ते जि. सिमा व हिप्परगा या, 3 कि.मी. रस्त्यासाठी 2 कोटी 61 लाख 51 हजार रुपये, शेलदरा – सोरगा – वडगाव- होकर्णा रे वांजरवाडी ते एस.एच.225 या 3.75 रस्त्यासाठी 3 कोटी 80 लाख 61 हजार रुपये उदगीर तालुक्यातील रस्त्यासाठी तर जळकोट तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 27.59 कि.मी. च्या रस्त्यासाठी 24 कोटी 7 लाख 50 हजार रुपये मंजूर केले आहेत. रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिल्याने आ.संजय बनसोडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीष महाजन यांचे मनःपुर्वक आभार व्यक्त केले आहेत.