पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात औसा पोलीस स्टेशनची छापेमारी, दारूबंदी कायद्याअंतर्गत 6 गुन्हे दाखल

पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात औसा पोलीस स्टेशनची छापेमारी, दारूबंदी कायद्याअंतर्गत 6 गुन्हे दाखल

लातूर (एल.पी.उगीले) : “आले शंकराच्या मना,तेथे अवैध दारू विक्रेत्यांचे कांहीं चालेना!”अशी चर्चा आता औसा परिसरात चालू आहे.एका बाजूला जिल्हा पोलीस प्रमुखांची कठोर भूमिका,त्यात पोलीस आधिकारिही कर्त्यव्य कठोर आल्याने,या भागात अवैध धांदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.नुकतेच अवैध दारू विक्रेत्यांवर मोठी कारवाई झाली आहे.

या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी औसा मधुकर पवार यांचे मार्गदर्शनात औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदाराचे वेगवेगळे पथक नेमून पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.

दरम्यान दिनांक 19/02/2023 रोजी विक्रीवर निर्बंध असतानाही काही इसम देशी विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करीत आहेत, अशी संबंधित पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पथकाने औसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठीक ठिकाणी छापेमारी करून देशीदारूची अवैध व विनापास, परवाना चोरटी विक्री व्यवसाय करीत असताना, देशी दारूचा अवैध विक्रीसाठी साठा करून ठेवलेल्या औसा तालुक्यातील एकूण 6 इसमांवर कार्यवाही करत त्यांच्याकडून देशी विदेशी दारूचा 36 हजार 360 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस ठाणे औसा येथे खालील नमूद इसमाविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. महादू गौतम चाबुकस्वार, (वय 30 वर्ष, राहणार नागरसोगा तालुका औसा),अशोक शिवराम चाबुकस्वार, (वय 59 वर्ष, राहणार नागरसोगा तालुका औसा),ओम प्रकाश दत्तात्रेय मसलकर ,(वय 30 वर्ष, राहणार नागरसोगा तालुका औसा),रावण तुकाराम गायकवाड, (वय 65 वर्ष, राहणार बोरफड तालुका औसा),दत्ता बब्रुवान मांजरे ,(वय 24 वर्ष, राहणार बोरफड तालुका औसा),व्यंकट नारायण ढोले, (वय 65 वर्ष, राहणार बोरफड तालुका औसा),पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 19/02/2023 रोजी औसा पोलीस ठाणे हद्दीत दिवसभर चाललेल्या कारवाईत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी औसा मधुकर पवार यांचे मार्गदर्शनात औसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांचे नेतृत्वातील पथका मधील पोलीस उपनिरीक्षक नितीन गायकवाड , इक्बाल शेख, पोलीस अमलदार दिनेश गवळी, नितीन सगर, गंगाधर सूर्यवंशी, भरत भुरे, राहुल डांगे, महारुद्र डिगे, समीर शेख, नवनाथ चामे,मदार बोपले यांनी सदरची कामगिरी केली आहे.

About The Author