आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून 79 गावासाठी 4 कोटी 40 लाखाचा निधी मंजूर
लातूर (एल.पी.उगीले) : राज्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालयाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील 75 गावासाठी 4 कोटी रुपयांचा आणि वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत 4 तांडा वस्तीसाठी 40 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. सदरील निधी मंजूर झाल्याने त्या त्या गावातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आ. कराड यांचे आभार व्यक्त केले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेवर आल्यापासून ग्रामीण भागातील विकासाला मोठी गती मिळाली आहे. लातूर ग्रामीण मतदार संघातील विविध गावागावाचा, वाडी, तांड्याचा विकास व्हावा, यासाठी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी वेळोवेळी सातत्याने सर्व संबंधिताकडे पाठपुरावा केला. आ रमेशआप्पा कराड यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय अंतर्गत वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून कृष्णानगर ता. लातूर, सतधरवाडीतांडा ता. औसा, रेणापूर तालुक्यातील कोळगाव तांडा, फरतपूरच्या सेवानगरतांडा वस्ती करिता 39 लाख 92 हजार रुपये आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालयाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत रामेश्वर, नागझरी, जेवळी, मुरुड, चिंचोली ब, गातेगाव, मांजरी, मुरुड अकोला, कासार जवळा, जवळा बु, वांजरखेडा, भातांगळी, पिंपळगाव आंबा, चिकलठाणा, कासारखेडा, सलगरा, मुशिराबाद, तांदूळवाडी, गाधवड, शिराळा, येळी, टाकळी ब, निवळी, बोडका, चाटा, एकुर्गा, भोयरा, टाकळी, हिसोरी, सलगरा ख, समसापूर, कारेपूर, पानगाव, खरोळा, पोहरेगाव, सुमठाणा, दर्जीबोरगाव, आरजखेडा, बिटरगाव, गरसुळी, चाडगाव, मोरवड, पळशी, कोष्टगाव, फावडेवाडी, खलग्री, मुसळेवाडी, व्हटी, सायगाव, आसराचीवाडी, माणूसमारवाडी, बावची, तळणी, आनंदवाडी, इटी, भादा, भेटा, कोरंगळा, वरवडा, येलोरी, सतदरवाडी, लाखनगाव, उटी, टाका, अंकोली, शेरा, ढाकणी, वंजारवाडी, कुंभारी, वानवडा, कुंभारवाडी, नरवटवाडी, बोरगाव काळे, सामनगाव, शेलू (बु) या 75 गावासाठी 4 कोटी रुपयाचा मंजूर झाला आहे. सदरील गावागावात निधी मंजूर झाल्याने भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांचे त्या त्या गावातील भाजपाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.