सर्जनशीलतेला स्वातंत्र्य देऊन शिक्षण देणारी नीलची शाळा – शेळके बालाजी

सर्जनशीलतेला स्वातंत्र्य देऊन शिक्षण देणारी नीलची शाळा - शेळके बालाजी

उदगीर (एल.पी.उगीले) : मुलांवर मनापासून प्रेम करा, त्यांना स्वातंत्र्य द्या, आणि मग बघा की कशी फुलतात? ते मुलांमधील सगळ्या देशांच्या व गुन्हेगारीच्या मुळाशी त्यांचं दबलेला बालपण आणि असमाधानच असतं, याच गोष्टींना हेरून त्यांना मनमोकळेपणाने संवाद साधत त्यांच्यातल्या सर्जनशीलतेला स्वातंत्र्य देऊन शिक्षण देणारी जागतिक पर्यटन केंद्र बनलेली एक अद्भुतरम्य शाळा म्हणजे नीलची शाळा होय. असे मत प्रसिद्ध शिक्षणतज्ञ शेळके बालाजी रामदास यांनी व्यक्त केले.

चला कवितेच्या बनात अंतर्गत शासकीय दूधडेअरीचे सभागृह उदगीर येथे साकोळे किरण शेषेराव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वाचक संवादाच्या २८३ व्या पुष्पात शेळके बालाजी रामदास यांनी ए. एस. नील , लिखित व सुजाता देशमुख अनुवादित नीलची शाळा अर्थात ‘समरहिल’ या साहित्यकृतीवर संवाद साधताना पुढे म्हणाले की, उत्तम कल्पनाशक्तीची देणगी लाभलेला नील, मुलांच्या हक्कांचा पुरस्कार करत शाळेचे पारंपरिक रूप बदलून मुले निर्भय मनाने शिकतील,असे वातावरण निर्माण केले. मुलांना आपली सर्जनशीलता आणि कल्पकता वापरण्याचे स्वातंत्र्य देऊन सामाजिक शहाणपणावर प्रश्न निर्माण करण्यास मुलांना उद्युक्त केले. वास्तवाचं भान ठेवून लिहिणारा लेखक म्हणून प्रसिद्ध असलेला नील, मुलांच्या अंतर्मनांच्या गरजा समजून घ्यायचा.ज्या शाळांना आपले विद्यार्थी त्रासदायक, समस्याग्रस्त, आळशी आणि मतिमंद वाटतात, त्या शाळांनी त्यांची मुले आमच्या शाळेत पाठवावे. असे जाहीर आव्हानही केले होते. मुलांना वाटणारी भीती, त्यांच्यातली आक्रमकता याबद्दल मुक्तपणे बोलू देऊन त्यांच्या दुःखाच निराकरण करत, समस्याग्रथ पालकांशी संवाद साधला. मुलांना प्रेम द्या, कारण जगाला प्रेमच वाचवू शकते. असं नील म्हणायचा. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबर सामाजिक प्रगतीचा ही विचार करून नील यांनी मुक्तपणाने शिकवणारी शाळा विद्यार्थ्यांसाठी चालू केली. त्याचं संपूर्ण चित्र या पुस्तकामध्ये आलेले आहे. प्रणय शृंगारातिल आनंद घ्या, युद्धातला नव्हे. असे आवाहन करीत अत्यंत प्रभावी व प्रवाहित ताकदीने ही शाळा चालवली.

यावेळी झालेल्या चर्चेत गिरीष पोतदार, मोहन निडवंचे यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला. शेवटी अध्यक्षीय भाषणात साकोळे किरण शेषेराव म्हणाले की, शेळके यांनी निवडलेली साहित्यकृती ही संपूर्ण शिक्षण क्षेत्रातल्या कार्यरत असणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत उपयोगी असून, शाळा कशी चालवायची? विद्यार्थी कसे घडवायचे? याबद्दलचे सविस्तर विवेचन या नीलच्या शाळेच्या माध्यमातून शेळके बालाजी यांनी केलेल आहे. हा वाचक संवाद म्हणजे अखंडितपणे चालणारा ज्ञानयज्ञ असून ज्ञानाची अनुभूती देणारा आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक अनंत कदम यांनी मांडले,पाहुण्यांचा परिचय प्रा.राजपाल पाटील यांनी करून दिला. संचालन अश्विनी निवर्गी यांनी केले तर आभार संगीता सोनाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी मिठू पाटील, आनंद बिरादार, मुरलीधर जाधव, बालाजी सुवर्णकार आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला जेष्ठ समीक्षक किशन उगले, संस्थाचालक हणमंतराव ढगे, अंतेश्वर चलवा, श्रीनिवास बेळकुंदे , उमाकांत चव्हाण दिगंबर सताळकर, बाळासाहेब पाटील, जाधव ताई, सुचिता कदम, उमाताई ढगे, आदींसह परिसरातील वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author