अंधत्व निवारण कार्य पुर्ण परिमंडळात करू – डाॅ.अर्चना भौसले

0
अंधत्व निवारण कार्य पुर्ण परिमंडळात करू - डाॅ.अर्चना भौसले

अंधत्व निवारण कार्य पुर्ण परिमंडळात करू - डाॅ.अर्चना भौसले

उदगीर (प्रतिनीधी) : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा अंदाज आहे की, 80% व्हिज्युअल हानी एकतर टाळता येण्याजोगा किंवा उपचाराने बरा होऊ शकतो.यामध्ये मोतीबिंदू,ऑन्कोसेरसि आसिस, ट्रॅकोमा,काचबिंदू,डायबेटिक रेटिनोपॅथी,अपवर्तक त्रुटी आणि बालपणातील अंधत्वाची काही प्रकरणे यांचा समावेश होतो.रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचा अंदाज आहे की, युनायटेड स्टेट्समधील अर्धे अंधत्व टाळता येण्यासारखे आहे.या धरतीवर आपण ही या परीमंडळात अंधत्व निवारण जनजागृती मोहीम यावर काम करू. असे डॉ. सौ. अर्चना भोसले यांनी सांगितले. त्या उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय उदगीर येथे आयोजित 19 वा वर्धापन दिन कार्यक्रमात लाॅ.आशोकभाई मेहता सभागृहात बोलत होत्या.या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटीया हे होते.प्रमुख पाहुणे डाॅ.अर्चना भौसले उपसंचालक आरोग्य सेवा विभाग, डाॅ.प्रदीप ढेले शल्यचिकित्सक लातूर,राजू गायकवाड दिव्यांग विभाग लातूर,डाॅ.संजय ढगे साह्यक उपसंचालक आरोग्य सेवा लातूर, डाॅ.दोडके,डाॅ शशिकांत देशपांडे, डाॅ.हारीश सुळे, डाॅ.दोडके, ईश्वरप्रसाद बाहेत,प्रदीप बेद्रे आदीसह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गित व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते शिबिर संयोजक यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, उदयगिरी नेत्ररूग्नालयाचे केवळ नाव ऐकुण होते, पण आज खरोखर मला आनंद झाला.माझ्या परीमंडळात खुप मोठी संस्था अंधत्व निवारणाचे कार्य डाॅ.रामप्रसाद लखोटीया व त्यांची सर्व टीम गेली 18 वर्षापासुन करत आहेत.या साठी माझे शब्द अपुरे आहेत, असे हे कार्य चालू आहे.या संस्थेच्या माध्यमातून आपण पुर्ण परिमंडळात पुढील अंधत्व निवारणाचे कार्य व जनजागृती करू, समाजातील गोर गरीब जनतेला दृष्टी देण्याचे सामाजीक कार्य असेच पुढे चालू राहील ही आपेक्षा ठेवून 19 वा वर्धापन दिनानिमित्त मला बोलावलात या बद्दल मी डाॅ.रामप्रसाद लखोटीयाजी व संस्थेची ऋणी आहे. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डाॅ.रामप्रसाद लखोटीया यांनी केले,तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी आदेप्पा यांनी केले.
या कार्यक्रमास उदगीर, जळकोट तालुक्यातील शिबिर संयोजक व उमेद महीला पदाधीकारी मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *