शिवाजी महाविद्यालयामध्ये महात्मा फुले यांचा स्मृतिदिन साजरा
उदगीर (प्रतिनिधी) : शिवाजी महाविद्यालयामध्ये महात्मा फुले यांचा १३४ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महात्मा फुले यांच्या कार्याचे स्मरण करत असताना प्राचार्य डॉ.मांजरे म्हणाले, महात्मा फुले हे थोर शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, स्त्री शिक्षणाचे उद्धारक,शुद्रादी-शुद्रांचे कैवारी होते.त्यांनी साहित्यातून समाजप्रबोधन केले.डोंगराएवढे कार्य करणाऱ्या मानवतावादी समाजसुधारक महात्मा फुले यांना सरकारने भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावे, असेही याप्रसंगी प्राचार्य मांजरे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जयंती समिती प्रमुख प्रोफेसर डॉ.सुरेश शिंदे यांनी केले तर आभार डॉ.डी.बी.मुळे यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक,कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी,व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.