छत्रपतीचे स्वराज्य लोक कल्याणकारी – प्रा.मारोती बुद्रुक पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : छत्रपती शिवरायांनी स्वत:साठी नव्हे रयतेचे लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करून इथल्या आठरा पगड जातीला न्याय मिळवून देण्याचे काम केले असे प्रतिपादन प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी केले. बोथी येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सवात बुद्रुक पाटील बोलत होते.
पुढे बोलताना बुद्रुक पाटील म्हणाले की,शिवरायांनी आयुष्यात अनेक लढाया केल्या.त्या कांही कोण्या जाती धर्मा विरोधात नव्हत्या तर जनतेला त्रासातून बेबंदशाहीतून मुक्त करण्यासाठी लढाया केल्या.छत्रपती शिवरायांनी उभ्या आयुष्यात लढाईसाठी किंवा शुभ कार्यासाठी केंहाही मुहुर्त पाहीला नाही.स्वराज्य निमिर्तीसाठी अनेक जाती धर्मातील विश्वासू मावळ्यांना एकत्रीत करुन स्वराज्याची संकल्पना पटवुन दिली.अनेक किल्यांची निर्मिती केली परंतू एकाही किल्याला स्वत:चे किंवा कुटुंबियांचे नाव दिले नाही यातून शिवरायांची उदारता दिसून येते. शिवरायांचे स्वराज्य हे लोककल्याणकारी लोकहितवादी जनसामान्यांच्या सुखासाठी निर्माण झालेले स्वराज्य होते आजच्या तरुण युवकांनी छत्रपती शिवरायांच्या लोकनीतीचा अभ्यास करावा असे आवाहन त्यांनी केले. छत्रपती शिवरायांना साध्या सुपारीच्या खंडाचे व्यसन नव्हते राजे निष्कलंक निस्वार्थी चारित्र्यसंपन्न कर्तव्यदक्ष निष्ठावंत राजे होते हा इतिहास सांगताना बोथीतील मुले भाऊक झाली. .25 मुलांनी घेतली निर्वेशनाची शपथ बोथी येथील 25 मुलांनी व्याख्यान ऐकून छत्रपती शिवरायांच्या समोर आयुष्यभर निर्व्यसनी राहण्याची शपथ घेतली. या कार्यक्रमासाठी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव मंडळ बोथी यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.