राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त हृदयरोग महा शिबिर
अहमदपूर (एल.पी.उगीले) : राष्ट्रसंत सद्गुरु डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या 107 व्या जन्मोत्सवानिमित्त भक्ती स्थळ येथे लहान बालक व प्रौढांचे महाआरोग्य शिबीर 25 फेब्रुवारी शुक्रवारी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. या शिबिरात प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ शंतनू गोमासे, डॉ सयाजी सरगर, डॉ दीपक एकलारे, डॉक्टर अभिजीत एलाले, तसेच खुबा व गुडघे बदलण्यास शस्त्रक्रिया तज्ञ डॉ संदीप श्रीवास्तव, डॉ ऋषिकेश पाटील, डॉ बिराजदार सह तज्ञ डॉक्टर लहान बालक व प्रौढांची मोफत तपासणी व उपचार व गरज पडल्यास मोफत शस्त्रक्रिया करणार आहेत.
या शिबिरासाठी पाटील हॉस्पिटलच्या वतीने आलेल्या सर्व रुग्णांचे मधुमेह ,हार्मोन, लिपिड फुफुसाची चाचणी अशा रक्ताच्या 38 चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत. तसेच धार्मिक कार्यक्रमात सकाळी 10 वाजता शंकरलिंग शिवाचार्य महाराज शिरूर अनंतपालकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून दुपारी 12 वाजता संगणबसप्पा शिवाचार्य महाराज निलंगा मठ व आचार्य गुरुराज स्वामी यांचे प्रवचन होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद असून या धार्मिक व आरोग्य तपासणी शिबिराछा लाभ घ्यावा, असे आवाहन भक्ती स्थळ, वीरमठ संस्थांनचे आचार्य गुरुराज स्वामी महाराज व भक्ती स्थळ विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भगवंतराव पाटील चांभारगेकर, सचिव सुप्रिया घोटे, मनमत आप्पा पालापुरे, सिद्धेश्वर पाटील, शीलाताई शेटकर, एडवोकेट कोथळे शिवप्रसाद कोरे, एड. बाबुराव देशमुख, ओम भाऊ पुणे, शिवकुमार उटगे, राजकुमार कल्याण, विनोद हेंगणे, अनिल कासनाळे, विठ्ठल गुडमे, मनमत प्रयाग, किशोर कोरे, राहुल शिवपुजे, निखिल कासनाळे यांनी केले आहे.