वारकरी शिक्षण संस्थेतून महाराष्ट्र संस्कृती घडवण्याचे कार्य होत आहे – माजी मंत्री आ.संजय बनसोडे

वारकरी शिक्षण संस्थेतून महाराष्ट्र संस्कृती घडवण्याचे कार्य होत आहे - माजी मंत्री आ.संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले): समाजामध्ये वावरात असताना आपल्या पुढच्या पिढीला सुसंस्कार देण्याचे काम आपल्या वारकरी संप्रदायातून होत असुन सामाजिक जिवनात आपल्यावर सुसंस्कार देण्याचे कार्य समस्त वारकरी मंडळ करत असते. त्याचाच एक भाग म्हणून उदगीर तालुक्यातील शिरोळ जनापूर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आयोजीत करण्यात आला आहे. वारकरी संप्रदायाचे शिक्षण देण्याचे काम हे मोलाचे असून यामुळे वारकरी शिक्षण संस्थेतून महाराष्ट्र संस्कृती घडवण्याचे कार्य होत असल्याचे मत माजी राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते उदगीर तालुक्यातील शिरोळ (जा.) येथील श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी शिक्षण संस्था आयोजित अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमास ह .भ. प संग्रामदेव महाराज शिरोळकर, लातूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजय निटुरे, माणिकराव कारभारी, उदय मुंडकर, संदीप महाराज पांचाळ, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, प्रा. श्याम डावळे, शिवदास चिमेगावे, रवी पाटील कौळखेडकर, उत्तमराव बिरादार, कैलास पाटील , सरपंच रामदास काळगापुरे, उपसरपंच केशव सगर, बाबुराव आंबेगाव , गंगाधर बिरादार, चेअरमन हणमंतराव मंदे, सुनील राठोड, ज्ञानोबा इदलकंटे, प्रसाद माना, आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, मूलभूत योजनेतून सन 2019-20 मध्ये शिरोळ येथे पेवर ब्लॉक व सिमेंट रोड करण्याकरता 7 लाख रुपये, मूलभूत योजनेतून सन 2020-21 मध्ये सभा मंडप बांधकाम करण्यासाठी 10 लाख रुपये, सामाजिक न्याय विभागातून सभागृह बांधकाम करण्याकरिता 15 लाख रुपये, मातोश्री शेत बंद रस्ते योजनेतून दीड किलोमीटरच्या रस्त्यासाठी 36 लाख रुपये, एक किलोमीटरच्या चांदेगाव रोड ते शिरोळ शिरूर रस्ता करण्यासाठी 22 लाख रुपये, रामगड तांडा ते जनापुर तांडा या दोन किलोमीटरच्या रस्त्यासाठी 48 लाख रुपये, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी एक कोटी 25 लाख रुपये, तांडा वस्ती सुधार योजनेतून सेवादास नगर येथे पेव्हर ब्लॉक करण्यासाठी 10 लाख रुपये , दुर्गादेवी बॉर्डर तांडा ब्लॉक करण्यासाठी 6 लाख रुपये, मृदू व जलसंधारण विभाग पाझर तलाव क्रमांक दोन ची दुरुस्ती करण्यासाठी 22 लाख 50 हजार रुपये, पाझर तलाव क्रमांक एक दुरुस्ती करण्यासाठी 21 लाख रुपये ,अशा विविध योजनेतून शिरोळ गावासाठी आमदार झाल्यापासुन 3 कोटी 58 लाख रुपयांचा निधी दिला असून या पुढील काळातील गावच्या विकासासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही आमदार संजय बनसोडे यांनी दिली. यावेळी हनुमंत शिवनगे, जिंदास पाटील, दत्तात्रय जवळगे, भागवत पाटील, रामा आयणीले, सुभाष पाटील, राहुल चिमेगावे, नामदेव मंदे, डॉ. विकास पाटील आदी उपस्थित होते.यावेळी विठ्ठल – रुक्मिणी वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी व शिरोळ जानापूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author