लातूर ग्रामीण मधील चार आरोग्‍य उपकेंद्राच्‍या इमारत बांधकामासाठी ३ कोटीचा निधी मंजूर

लातूर ग्रामीण मधील चार आरोग्‍य उपकेंद्राच्‍या इमारत बांधकामासाठी ३ कोटीचा निधी मंजूर

लातूर (दयानंद स्वामी) : लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील दवणगाव, घनसरगाव, कामखेडा (ता. रेणापूर) आणि नकुलेश्वर बोरगाव (ता. औसा) या चार ठिकाणच्या जीर्ण झालेल्या आरोग्य उपकेंद्रच्या इमारती पाडून नव्याने बांधकाम करण्यासाठी भाजपाचे नेते आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या प्रयत्‍नातून तब्‍बल ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदरील निधी मंजूर झाल्‍याने त्‍या त्‍या गावातील भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यासह नागरीकांनी आ. कराड यांचे आभार मानले.

ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सुविधा देता याव्यात यासाठी अनेक गावात शासनाने आरोग्य उपकेंद्र निर्माण केले. या उपकेंद्रातून गोरगरीब, सर्वसामान्‍य जनतेला आरोग्‍याच्‍या प्राथमिक सुविधा मिळत आहेत. मात्र लोकहिताच्या या आरोग्य उपकेंद्राच्या इमारती जून्‍या झाल्‍याने मोडकळीस आल्‍या आहेत. सदरील जीर्ण झालेल्या या इमारती पाडून नव्याने त्या ठिकाणी इमारतीचे बांधकाम करण्यात यावे यासाठी आ. रमेशआप्पा कराड यांनी सर्व संबंधिताकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. आ. रमेशअप्‍पा कराड यांनी वेळोवेळी केलेल्‍या पाठपुराव्‍याला यश आले असून त्यानुसार जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या माध्यमातून लातूर ग्रामीण मतदार संघातील दवणगाव, घनसरगाव, कामखेडा (ता. रेणापूर) आणि नकुलेश्वर बोरगाव (ता. औसा) येथील चार आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीसाठी प्रत्येकी ७५ लक्ष रुपये याप्रमाणे तब्बल ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

सदरील निधी मंजूर झाल्याबद्दल भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांचे घनसरगाव येथील माजी सरपंच शरद दरेकर, उपसरपंच प्रविण शिंदे, ग्रामपंचायत सदस्‍य चंद्रकांत पवार, अॅड. एन.बी. जाधव, सुरेश जाधव, माधव कांबळे, निलेश कापसे, विश्‍वनाथ गाडे, शफीयोद्दीन शेख, प्रकाश जाधव, हनुमंत पवार आदींनी पुष्‍पहार घालून सत्‍कार केला व आभार व्‍यक्‍त केले. यावेळी तालुकाध्‍यक्ष अॅड. दशरथ सरवदे, महिला आघाडी तालुकाध्‍यक्ष अनुसया फड यांच्‍यासह अनेकजण उपस्थित होते. त्‍याचबरोबर दवणगाव, कामखेडा, नकुलेश्‍वर बोरगाव येथील भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यासह नागरीकानी आरोग्‍य उपकेंद्राच्‍या इमारती जीर्ण झाल्‍याने नवीन बांधकामासाठी निधी उपलब्‍ध करून दिल्‍याबद्दल भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांचे आभार व्‍यक्‍त केले आहेत.

About The Author