लक्षीरमणजी लाहोटी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा!
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी यांचा वाढदिवस शनिवार दिनांक ०४ मार्च २०२३रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. लातूरच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये लाहोटी परिवाराचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. लातूर शहरात श्रीमती गोदावरीदेवी कन्या पाठशाळा, पुरणमल लाहोटी शाळा, मारवाडी राजस्थान विद्यालय, बंकटलाल इंग्लीश स्कुल, राजा नारायणलाल लाहोटी सी.बी.एस.सी. स्कूल, केशरबाई भार्गव प्राथमिक शाळा व दयानंद शिक्षण संस्थेतील एकुण सात महाविद्यालये असा शैक्षणीक संस्थांचा विस्तार आहे. दयानंद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी ते विराजमान आहेत. त्यांनी शिक्षण संस्थेचा नावलौकिक प्राप्त करून देण्याकरिता अनेक उपक्रम राबविले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात कौशल्याभिमुख उपक्रम राबवून विद्यार्थी हिताय उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील आहेत. अशा शिक्षणाची दिव्य दृष्टी लाभलेल्या व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसानिमित्त दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला.
त्यांनी दयानंद शिक्षण संस्थेमध्ये लॉन टेनिस कोर्ट, इन्डोर स्टेडियम, पावणे दोन कोटी रुपयांचे क्रिकेट मैदान, मुला मुलींना स्वंतत्र व्यायमशाळा, बी.फार्मसी, डी.फार्मसी, इंटेरियर डिझाईन, बी ए . प्रशासकिय सेवा, बी ए ऍ़निमेशन ,बी ए फॅशन व ड्रेस डिझाइन आशा विविध व्यवसायाभिमुख कोर्सेसची सुरुवात करून एक नवीन दयानंद पॅटर्न निर्माण केला. एवढेच नाही तर पाणी पुर्नवापर करण्याचा प्रकल्प उभा करून सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. दयानंद शिक्षण संस्था अध्यक्षपदी विराजमान राहून सामाजिक बांधीलकी जपत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
अध्यक्ष साहेबांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी शाल, फेटा देऊन दीर्घायुषी होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. वाढदिवसनिमित्य गरीब व गरजु विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी दयानंद कला महाविधालयाचे उपप्राचार्य डॉ प्रशांत मान्नीकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, कार्यालयीन अधीक्षक रुपचंद कुरे सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.