नांदेड परिक्षेत्रात दुसऱ्या दिवशी (25) गुन्हे दाखल, (28) इसमांविरुद्ध कारवाई, 16 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

0
नांदेड परिक्षेत्रात दुसऱ्या दिवशी (25) गुन्हे दाखल, (28) इसमांविरुद्ध कारवाई, 16 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

लातूर (एल पी उगीले)
पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी, दिनांक 1 ते 31 मे, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, अंमली पदार्थ, घातक शस्त्रे इत्यादी विरोधी मोहिम राबविण्याचे निश्चित केले आहे.
सदर मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी नांदेड परिक्षेत्रात, महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत (10) इसमांविरुद्ध कारवाई करून त्यांचेविरुद्ध (7) गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून 1,36,670/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर, अवैध दारू विक्री करणाऱ्या (12) आरोपींविरुद्ध (12) गुन्हे दाखल करून, त्यांच्याकडून 1,20,440/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासोबतच, अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत 2 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून, शस्त्र अधिनियम, कोटपा इत्यादी अधिनियमाखाली दिवसभरात एकूण (25) कारवाया करण्यात आल्या असून, यात निष्पन्न झालेल्या आरोपीतांकडून 16,52,975 /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

‘ खबर ‘ हेल्पलाइन ची मोठी मदत : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना देता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन करण्यात आले होते. सदर हेल्पलाइनवर नागरिकांनी विश्वास दर्शविला असून, परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांच्या निर्मूलनासाठी सदर हेल्पलाइनची मोठी मदत होत असल्याचे, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!