उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाने उदगीर चे नाव जागतिक पातळीवर पोहोचवले – नगराध्यक्ष सौ स्वातीताई सचिन हुडे

0
उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाने उदगीर चे नाव जागतिक पातळीवर पोहोचवले - नगराध्यक्ष सौ स्वातीताई सचिन हुडे

उदगीर (एल पी उगीले) उदगीर येथील उदगिरी लाईव्ह धर्मादाय नेत्र रुग्णालयाने जागतिक पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवून उदगीर चे नाव जागतिक पातळीवर गौरवान्वित केले आहे. असे उद्गार उदगीरच्या नगराध्यक्ष सौ. स्वातीताई सचिन हुडे यांनी काढले.
उदयगीर मध्ये मोफत तिरळेपणा तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन उत्साहात उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्ररुग्णालय, उदगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत तिरळेपणा तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन सौ. स्वातीताई हुडे, नगराध्यक्षा, उदगीर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपनगराध्यक्ष सौ. शितल ताई शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्ररुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटीया, सहसचिव महेश बसपुरे, कोषाध्यक्ष अजय मलगे, सुरेश देबडवार, विवेक जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उदयगिरी नेत्रमंदिराच्या वतीने उपस्थित प्रमुख मान्यवरांचा अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटीया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शिबिराच्या माध्यमातून तिरळेपणा असलेल्या रुग्णांना तज्ज्ञांकडून तपासणी व आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
यावेळी डॉ. शीतल पेद्दावाड, डॉ. स्नेहा केंद्रे, डॉ. सागर समगे, उज्वला हेंद्रे यांच्यासह रुग्णालयातील सर्व डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!