उत्कृष्ट कामगिरीबद्दल एलसीबी चे राजेश कंचे यांचा गौरव; पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशंसापत्र प्रदान

0
उत्कृष्ट कामगिरीबद्दल एलसीबी चे राजेश कंचे यांचा गौरव; पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशंसापत्र प्रदान

लातूर (एल पी उगीले) : उत्कृष्ट सेवाभाव, तत्परता आणि गुन्हे उकलण्यात दाखवलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार राजेश विठ्ठलराव कंचे यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.
पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या राजेश कंचे यांनी आपल्या सेवेत सातत्य ठेवत गुन्ह्यांच्या तपासात विशेष कामगिरी बजावली आहे. विशेषतः एका खून प्रकरणातील आरोपींचा ठावठिकाणा लावून गुन्ह्याची उकल करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले.
पोलीस महासंचालक कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या या प्रशंसापत्रावर लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची स्वाक्षरी असून, हा सन्मान लातूर येथे प्रदान करण्यात आला.कंचे यांच्या कार्याचे पोलीस विभागात सर्वत्र कौतुक होत असून, पोलीस फ्लॅश न्यूज च्या वतीने त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!