पंचायतराज मूल्यमापन समितीवर पत्रकार बिभीषण मद्देवाड यांची नियुक्ती
उदगीर (प्रतिनिधी) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या अंतर्गत पंचायत समिती पातळीवरील उत्कृष्ट ग्रामपंचायतला पुरस्कार दिला जातो. या ग्रामपंचायतीची पाहणी करण्यासाठी तालुकास्तरावर समिती गठित करण्यात येते, उदगीर पंचायत समितीमध्ये देखील गटविकास अधिकारी मेडेवार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय मूल्यमापन समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीवर करमाळा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे मूल्यमापन करणाऱ्या महत्त्वपूर्ण अशा समितीवर बिभीषण मद्देवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.गट विकास अधिकारी मेडेवार यांचे अध्यक्षते खाली तालुकास्तरीय मूल्यमापन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून गटविकास अधिकारी मेडेवर यांनी सदस्य म्हणून विस्तार अधिकारी पंचायत, विस्तार अधिकारी सांख्यिकी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती यांचा या पथकामध्ये समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाच्या तालुकास्तरीय मूल्यमापनासाठी गट विकास अधिकारी पंचायत समिती, उदगीर यांना पंचायत समिती, करमाळा जि. सोलापूर ही निश्चित करुन देण्यात आलेली आहे.
ग्रामपंचायतचे मूल्यमापन करणाऱ्या समितीवर पत्रकार बिभीषण मद्देवाड यांची नियुक्ती झाल्याबद्दल माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, पंचायत समितीचे सभापती वनमाला मरलापल्ले, उपसभापती बापूसाहेब भोसले, अखिल भारतीय मराठी पत्रकार परीषदेचे विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे, व्हि एस कुलकर्णी, रविंद्र हसरगुंडे, उदगीर तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष युवराज धोतरे, पत्रकार हल्ला विरोधी कृषी समीतीचे निमंत्रक अर्जुन जाधव, डिजिटल मिडीयाचे जिल्हा सचिव सिध्दार्थ सुर्यवंशी,रसुल दा पठाण, विनायक चाकुरे , सुनिल हावा, लक्ष्मण बेंबडे,विक्रम हलकीकर, इरफान शेख, तालुकाध्यक्ष बस्वेश्वर डावळे, महादेव रोडगे, विश्वनाथ गायकवाड, प्रभुदास गायकवाड, सुधाकर नाईक, मंगेश सुर्यवंशी, संदीप निडवदे, मनोहर लोहारे, शिवाजी शिंदे, हणमंत केंद्रे, नागनाथ गुट्टे, अनिल जाधव, श्रीधर सावळे, बालाजी कसबे,बबन कांबळे आदिंनी अभिनंदन केले आहे.
