‘सार्वजनिक शिवजयंती उत्सव’ विविध स्पर्धेत श्यामलालचे घवघवीत यश
उदगीर (एल.पी.उगीले) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती उदगीर यांच्या वतीने शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये श्यामलाल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले. सार्वजनिक शिवजयंती उत्सवा अंतर्गत आयोजित भाषण स्पर्धेमध्ये श्यामलाल हायस्कूलच्या बिरादार साईविश्व या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल या विद्यार्थ्यास या समितीमार्फत स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आले. तसेच लोककला महोत्सव अंतर्गत नृत्य स्पर्धेमध्ये सुद्धा श्यामलाल हायस्कूलच्या समूह नृत्यास द्वितीय क्रमांक मिळाला, त्याबद्दल यात सहभागी विद्यार्थी शिंदे कृष्णा, धुमाळे योगेश, पिचारे दिपक, कामालापुरे सोहम, डोंगरे उमेश, बेद्रे प्रणव या विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
सार्वजनिक शिवजयंती उत्सवात सहभाग घेऊन यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक आनंद चोबळे, प्रभारी उपमुख्याध्यापक बालाजी चव्हाण, प्रभारी पर्यवेक्षक राहुल लिमये, गट साधन केंद्र उदगीर चे विषयतज्ञ धनाजी जाधव यांच्या हस्ते पुष्पहार घालून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले, व शुभेच्छा देण्यात आल्या. या विविध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक नामदेव हके, उमाकांत सूर्यवंशी यांचेही सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती व शाळेच्या वतीने स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. सार्वजनिक शिवजयंती उत्सवांतर्गत विविध स्पर्धेत शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल समितीमार्फत शाळेचे मुख्याध्यापक आनंद चोबळे यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विविध स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे संस्थेचे अध्यक्ष ऍड.सुपोषपाणि आर्य, उपाध्यक्ष गिरीश मुंडकर,सचिव ऍड. विक्रम संकाये, सहसचिव अंजुमणी आर्य यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.