लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत होळी सण उत्साहात साजरा
उदगीर (एल.पी.उगीले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ.सोनिया देशपांडे तर, प्रमुख पाहुणे म्हणून विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व सुरेखाबाई कुलकर्णी उपस्थित होते. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते होलिका पूजन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका सौ.सोनिया देशपांडे यांनी होळी सण संपूर्ण भारतात हिंदू धर्मामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.पुतणा व टुंडा राक्षसनीच्या कथा सांगितली.होळी म्हणजे निसर्गाचे संक्रमण.सृष्टीतील घाण जाळून स्वच्छता करण्याचा,रोगराई नष्ट करण्याचा सण म्हणजे होळी.आपल्यातील दुर्गुण जाळून चांगल्या सवयी लावण्याचा संकल्प आजच्या दिवशी विद्यार्थ्यांनी करावा.असे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी विद्यार्थ्यांनी वाईट संगत,वाईट सवयी सोडून चांगले मित्र व चांगल्या सवयी आपल्या अंगी रुजवाव्यात,रंगपंचमी साजरी करताना कृत्रिम रंग न वापरता नैसर्गिक रंगांचा वापर करावा.असे आवाहन केले.कार्यक्रमाची सांगता होलिका दहनाने झाली.विद्यार्थ्यांनी आपल्यातील दुर्गुण लिहिलेल्या चिठ्ठ्या होळिमध्ये दहन केल्या.सुत्रसंचलन सौ.सुनिता कांबळे यांनी केले तर, आभार सौ.अर्चना सुवर्णकार यांनी मानले.