आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यु.कॉलेज कडून लाईनमन कृतज्ञता दिन साजरा

आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यु.कॉलेज कडून लाईनमन कृतज्ञता दिन साजरा

देवणी (प्रतिनिधी) : आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यु. कॉलेज देवणी येथील विद्यार्थ्यांनी एम एस इ बी देवणी येथील लाईनमन, सेवक व वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून कृतज्ञता दिवस साजरा करण्यात आला. ऊन, पावसाची तमा न बाळगता परिस्थिती कोणतीही असो प्रामाणिकपणे आपल्याला सेवा देणाऱ्या लाईनमॅन हिरो त्यांचा गौरव व आभार व्यक्त करण्याचा दिवस अर्थात लाईन मॅन कृतज्ञता दिवस एक वेगळ्या पद्धतीने आबासाहेब इंग्लिश स्कूल च्या टीमने साजरा केला. विजेच्या एका बटनामध्ये विस्तारलेल्या प्रचंड मोठ्या वीज यंत्रणेत अदृश्य असलेल्या विजेला सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीज क्षेत्रातील महिला व पुरुष तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अर्थातच त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेने व शाळेतील विद्यार्थ्यांनी एम एस ई बी देवणी येथे प्रत्यक्ष भेट देऊन तेथील लाईनमन चा सत्कार व आभार व्यक्त केला.

जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपनीचे अध्यक्ष गोविंदरावजी भोपणीकर व संस्थेचे सचिव गजाननजी भोपणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक . प्रशांत घोलपे यांनी या भेटीला नियोजनपूर्वक आकार दिले. व तसेच शाळेतील शिक्षक रणजीत गायकवाड व श्रद्धा डोंगरे यांनी विजे संदर्भातील प्रश्नावलीसह शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन वीज महावितरण या कार्यात कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून विजेपासून होणाऱ्या धोक्यापासून सावध राहण्या संदर्भात माहिती मिळवली.

About The Author