उदगीरचा विकास हाच माझा ध्यास – माजी मंत्री आ.संजय बनसोडे

उदगीरचा विकास हाच माझा ध्यास - माजी मंत्री आ.संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले): कोरोना काळात महाराष्ट्रातील एस.टी. बसची अवस्था अतिशय बिकट होऊन महामंडळ डबघाईला आले होते. त्याचा अतिरिक्त भार राज्य शासनावर पडल्याने मंजूर असलेले बस स्थानकाचे काम रखडले, मागील काळात भूमिपूजन होऊनही काम झाले नाही. मात्र मी आमदार झाल्यानंतर सततचा पाठपुरावा केला आणि तेंव्हाचे अर्थमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांनी तत्वता मान्यता दिली. त्यानंतर नव्याने प्रशाकीय मान्यता, वर्क आँर्डर केली आणि आज प्रत्यक्ष बस स्थानकाच्या इमारतीचे आपण भुमीपुजन सोहळा करत आहोत. गेल्या तीन वर्षात केवळ उदगीर मतदार संघाचा विकास करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला आहे. उदगीरचा विकास करणे हाच माझा ध्यास असल्याचे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते उदगीर बसस्थानकाच्या भुमीपुजनाप्रसंगी बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.शिवाजी मुळे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, रा.काँ.चे शहराध्यक्ष समीर शेख, शहराध्यक्ष मजुंरखाँ पठाण, बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील,माजी उपसभापती रामराव बिरादार, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख कैलास पाटील, माजी जि.प. सदस्य ज्ञानेश्वर पाटील,चंद्रकांत टेंगेटोल, श्रीमंत सोनाळे, मुन्ना पांचाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा उर्मिला वाघमारे, महिला शहराध्यक्षा दिपाली औटे, मैनाताई साबणे, प.स.माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, राज्य परिवहन महामंडळाचे कार्यकारी अभियंता गणेश राजगिरे, लातूरचे विभागीय नियंत्रण अश्वजीत जानराव, उपविभागीय अभियंता कोकाटे, प्रा.गोपाळकृष्ण घोडके, श्रीमंत सोनाळे, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, फय्याज शेख, इब्राहिम शेख, सय्यद जानी, रोहिदास कुंडगीर, मुकेश भालेराव, उदयसिंह मुंडकर, सनाउल्ला खान, कुणाल बागबंदे, पाशा बेग, देऊळवाडीचे सरपंच शुभम केंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल केंद्रे, बालाजी पाटील नेत्रगावकर, मनोज बेल्लाळे, ज्ञानेश्वर बिरादार, अजय शेटकार, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, उदगीर मतदार संघात श्रेयवादाची लढाई मला करायची नाही. आपण सर्वांनी मला निवडून दिलात, म्हणून मी आपल्या भागाचा विकास करु शकलो. मी आमदार म्हणून नाही तर जनतेचा सेवक म्हणून काम करत आहे. यापुढेही उदगीरच्या विकासाचा रथ कधीच थांबवणार नाही, अशी ग्वाही दिली. अनेक गावामध्ये आजही एस.टी. महामंडळाची बस नव्हती त्या गावी बस पाठवण्याचे काम आपण केले आहे. कारण ग्रामीण भागाला जोडणारी जिवनवाहिणी म्हणून आपण लालपरीकडे पाहतो. त्यामुळेच आपण उदगीर आगारात ५० नविन बस आणल्या आहेत, आणि आणखी ५० येणार आहेत. आता आपण अद्यावत बसस्थानकाची निर्मितीकरत असून वेळेत त्याचे काम पूर्ण करण्याच्या सुचना ही संबंधित ठेकेदाराला आ.संजय बनसोडे यांनी दिल्या.

या बसस्थानकात 18 प्लॅटफॉर्म , हिरकणी कक्ष, पार्सल रूम, पोलीस चौकी, दहा दुकाने, उपहारगृहासह , महिला व पुरुष प्रसाधनगृह, चौकशी कक्ष, आरक्षण रूम, औषधी दुकान, आदींचा समावेश असुन हे बसस्थानक दर्जेदार होणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.श्याम डावळे यांनी केले. यावेळी महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते व बसस्थानकातील कर्मचारी व प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author