आरजखेडा येथे काँग्रेसचे हात से हात जोडो अभियान
राहुल गांधींच्या संदेशाचे व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांचे विकास कामाच्या पत्रीकेचे वाचण
लातूर/ रेणापूर (प्रतिनिधी) : रेणापूर तालुक्यातील आरजखेडा येथे काॅग्रेसचे हात से हात जोडो अभियान अंतर्गत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील संदेशाच्या पत्रकाचे व लातूर ग्रामीण चे आ.धिरज विलासराव देशमुख यांनी आरजखेडा गावास 86 लक्ष रुपये विकास निधीच्या पत्रीकेचे वाचन करण्यात आले.
यावेळी रेणापूर तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे चेअरमन प्रमोद आबा जाधव, रेणापूर तालुका सेवा दल काँग्रेस चे अध्यक्ष हनमंत तात्या पवार, विद्यार्थी काँग्रेस रेणापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब करमुडे, आरजखेडा सोसायटी चे चेअरमन माणिकराव सुर्यवंशी, रेणापूर बाजार समिती चे संचालक प्रकाश सुर्यवंशी, महादेव सुर्यवंशी तालुका अध्यक्ष स्वस्त धान्य दुकानदार, गोपाळ सुर्यवंशी, नेताजी सुर्यवंशी, विठ्ठल सूर्यवंशी, सेवा दल काँग्रेस चे तानाजी सुर्यवंशी, स्वामी यांच्या सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.