महिलांनी डिजिटल कौशल्य विकसित करून सक्षम बनावे – डॉ.अनुराधा पाटील

महिलांनी डिजिटल कौशल्य विकसित करून सक्षम बनावे - डॉ.अनुराधा पाटील

उदगीर (एल.पी.उगीले) : आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे.या युगामध्ये विज्ञान-तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानात प्रचंड भरारी घेतली जात आहे.यामध्ये महिलांचे योगदान मोठे आहे. महिलांनी माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रचंड भरारी घेतलेली आहे. ज्या महिला यापासून दूर आहेत, त्या महिलांनी डिजिटल कौशल्य विकसित करून सक्षम बनावे, असे मत समाजशास्त्र विभागातील डॉ अनुराधा पाटील यांनी व्यक्त केले.शिवाजी महाविद्यालय येथे आयक्वेशी विभाग व महिला सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विभागाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून घेतलेल्या कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनायक जाधव हे होते. तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य डॉ आर एम मांजरे,आयक्वेशीचे समन्वयक तथा सीनेट सदस्य ग्रंथपाल डॉ. विष्णू पवार, महिला विभागाच्या समन्वयक डॉ. उर्मिला शिरशी, डॉ पावडे एस एस,डॉ प्रणिता पाटील यांची होती. पुढे बोलताना पाटील म्हणाल्या, माहिती तंत्रज्ञान अगदी खेड्यापाड्या पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. आज मीडियाने सर्व जगावर नियंत्रण मिळवलेले आहे .या सर्वांमध्ये महिलांचा वाटा अतिशय मोठ्या प्रमाणात राहिलेला आहे. यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त उपप्राचार्य डॉ आर एम मांजरे, डॉ विष्णू पवार यांनी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ.विनायक जाधव म्हणाले, आजच्या युगामध्ये महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. एवढेच नव्हे तर त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये एक पाऊल पुढे टाकत आहेत असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ उर्मिला शिरशी यांनी तर आभार कु मनीषा कोयले या विद्यार्थिनीने मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

About The Author