राष्ट्रवादी अर्बन व आयटी सेल च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

राष्ट्रवादी अर्बन व आयटी सेल च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

लातूर (प्रतिनीधी) : लातूर शहरातील सर्वात गजबजलेल्या परिसर म्हणजे गंजगोलाई व त्याचा परिसर होय. आपण रात्री झोपेत असताना हा परिसर स्वच्छ व चकाचक करणा-या साफसफाई महिला कर्मचाऱ्यांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गंजगोलाई परिसरात कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून राष्ट्रवादी अर्बन व राष्ट्रवादी आयटी सेल व शारदा फाउंडेशनच्या वतीने त्यांना सेफ्टी हॅन्डग्लोज (हातमोजे) व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कामाचे कौतुक करून आभार व्यक्त केले. तसेच यावेळी साफसफाई महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी डी उमाकांत, मयुरजी बनसोडे, राष्ट्रवादी असंघटीत कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष आदर्श उपाध्ये, सतीश वाघमारे, आकाश कांबळे, सुनिल कांबळे, गणेश सिणगिले, दिपक सुर्यवंशी, विकास माने यांच्या सह अनेकजण उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!