व्हटी व सायगाव येथे काँग्रेसचे हात से हात जोडो अभियान
राहुल गांधींच्या संदेशाचे व लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांच्या विकास कामाच्या प्रत्रीकेचे वाचन
रेणापूर (प्रतिनिधी) : लातूर ग्रामीण मतदार संघातील व्हटी व सायगाव येथे दि 8 मार्च रोजी काॅग्रेसचे हात से हात जोडो अभियान अंतर्गत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील संदेशाच्या पत्रकाचे व लातूर ग्रामीण चे आ.धिरज विलासराव देशमुख यांनी व्हटी गावास आनलेल्या 39 लक्ष रुपये व सायगाव गावास आनलेल्या 10 लक्ष रूपये विकास निधीच्या पत्रीकेचे वाचन करण्यात आले.
यावेळी रेणापूर तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे व्हा चेअरमन प्रमोद आबा जाधव, रेणा कारखान्याचे संचालक चंद्रकांत सुर्यवंशी, विद्यार्थी काँग्रेस रेणापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब करमुडे, कोष्टगावचे मा सरपंच जयवंत कुलकर्णी, व्हटी गावचे उपसरपंच हरिदास सुर्यवंशी, ग्रा पं सदस्य श्याम सुर्यवंशी, नृसिंह सुर्यवंशी, निवृत्ती कांबळे, पांडू टमके, विश्वनाथ कराड, रामचंद्र कराड , रामकिसन कराड, प्रभु सूर्यवंशी, संजय केदार, निवृत्ती मुंडे यांच्या सह गावातील व्हटी व सायगाव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.