पाणीपुरवठा योजना भूमिपूजन आणि २ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा लोकार्पण आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न

पाणीपुरवठा योजना भूमिपूजन आणि २ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा लोकार्पण आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायत धसवाडी ता.अहमदपूर भूमिपूजन सोहळा व १५ व्या वित्त आयोगातून २ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करत विकासकामांचे लोकार्पण केले. तसेच स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला.समवेत कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तमराव देशमुख, माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते अविनाश देशमुख, सभापती शिवानंद तात्या हेंगणे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जिल्हा परिषद गटनेते मंचकरावजी पाटील, माजी सभापती शिवाजीराव खांडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, माजी सभापती ॲड.टी.एन कांबळे, महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मीनाक्षीताई शिंगडे, माऊली पाटील, शेखर चौधरी, शाहूताई कांबळे, अविनाश देशमुख, सचिन पडिले, नबी सय्यद, फेरोज शेख, चंद्रकांत गंगथडे, शेटकार अभिजीत, शाखा अभियंता सोनकांबळे, शाखा अभियंता ऋषिकेश शेकडे, विकास मेवाडा, शुभम दहिफळे, विष्णू आलापुरे, अभियंता शृंगारे, मनोहर गायकवाड, दिनेश पाटील, वाझेश्वर पवार, चातरे ग्रामसेवक, चंद्रकांत देशमुख, नारायण दुर्गे, बळीराजा लष्करी, शामराव राठोड, रंगनाथ पाटील, संजय पौळ, मधुकर पाटील, संगीतराव शिरसागर, बाबुराव कोळगीर, गंगाधर हेमनर, गंगाधरराव जाधव, गोविंद घोडके, भाऊसाहेब जाधव, भास्कर बिडगर, शिवाजी राठोड, उत्तमराव शिरसागर, रंगनाथ पाटील, दुर्गे नाना, ज्ञानोबा खांडेकर, श्रीहरी शिरसागर, बाबुराव कोळीगीर, गणपती बोईनवाड, शिवाजी पुरी आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!