१ कोटी ५६ लाख रुपयांच्या तलाव दुरुस्ती कामाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते भुमिपुजन
अहमदपूर (गोविंद काळे) : मौजे चिखली ता.अहमदपूर येथे १ कोटी ५६ लाख रुपयांच्या तलाव दुरुस्ती कामाचा भूमिपूजन समारंभ मान्यवरांच्या उपस्थित आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच बालाजीराव चाटे, माजी सभापती शिवानंद तात्या हेंगणे, जिवनकुमार मद्देवाड सर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मीनाक्षीताई शिंगडे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब साखरे, चेअरमन संग्राम चामे, महिला तालुकाध्यक्ष शाहूताई कांबळे, इमरोज पटवेकर, उपअभियंता सुरेंद्र जाधव, उपअभियंता नाबदे साहेब, कंत्राटदार परमेश्वरराव माले, अभियंता प्रफुल्ल गुंडरे, विवेक माले, दयानंद पाटील, सतीश आप्पा कल्याने, अमोल जाधव, माजी सरपंच मुंडे, चेअरमन चंद्रकांत बनसोडे, बाळू पवार, तात्याराव साळुंखे, भरत शिंदे, रफिक शेख, दिलदार शेख, शार्दुल शेख, सरपंच संभाजीराव गायकवाड, मनोहर गायकवाड, अशोकराव साठे, बापूराव चाटे, नाथराव चाटे, गणेश चाटे, माऊली दहिफळे, वैजनाथ कराड, जनार्दन कराड आदी मान्यवर उपस्थित होते.