यशवंत विद्यालयाचे सहशिक्षक शरद करकनाळे यांना पी एच डी प्रधान
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालयातील हिंदी विषयाचे तज्ञ शिक्षक श्री शरद अशोकराव करकनाळे यांना हिंदी विषयांमध्ये भाषिक वैश्विकरण मे बाजारवादा और जनसंचार माध्यमो मे विज्ञापन: विवेचनात्मक अध्ययन या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या वतीने दि. 14 रोजी पी एच डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद चे प्रोफेसर डॉक्टर सुधाकर शेंडगे, मानवसंकाय विभागाचे अध्यक्ष डॉ. अजय टेंगसे, उप कुलगुरू डॉक्टर सर्जेराव शिंदे यांच्या हस्ते प्रधान करण्यात आले. त्यांना प्राचार्या डॉक्टर अनिता शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते. या नेत्रदीपक यशाबद्दल टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर, सचिव डी बी लोहारे गुरुजी, प्राचार्य व्ही व्ही गंपले, उप मुख्याध्यापक उमाकांत नरडेले, पर्वेक्षक दिलीप गुळवे, गजानन शिंदे राम तत्तापुरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.