विद्यार्थी व पालक यांच्या आरोग्याची काळजी घेणारे अहमदपूरचे महात्मा फुले महाविद्यालय – आयुर्वेदाचार्य डॉ. प्रवीण बढे यांचे गौरवोद्गार

विद्यार्थी व पालक यांच्या आरोग्याची काळजी घेणारे अहमदपूरचे महात्मा फुले महाविद्यालय - आयुर्वेदाचार्य डॉ. प्रवीण बढे यांचे गौरवोद्गार

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयातील प्राचार्य व सर्व प्राध्यापकवृंद विद्यार्थी व पालक आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्वोतोपरी सदैव तत्पर असते. यांच्यासह जे कोणी अशी काळजी घेतील त्यांना कोणत्याही मंदिरात जाण्याची गरज नाही असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुपरिचित असलेल्या प्रिस्टाइन आयुर इंडिया प्रा. लिमिटेड पुणे कंपनीचे सर्वेसर्वा सीएमडी आयुर्वेदाचार्य डॉ. प्रवीण बढे यांनी केले. आयुर्वेदाचार्य डॉ. प्रवीण बढे हे अहमदपूर दौ-यावर असतांना त्यांनी महात्मा फुले महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली.यावळी त्यांनी महात्मा फुले महाविद्यालयाने विकसित केलेल्या ‘मियावाकी अर्थात अटल घनवन या प्रकल्पास सदिच्छा भेट दिली.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली महाविद्यालयीन स्तरावर लातूर जिल्ह्यात पहिल्या विकसित केलेल्या मियावाकी प्रकल्पास आयुर्वेदाचार्य डॉ.प्रवीण बढे यांनी भेट देऊन, महाविद्यालय राबवित असलेल्या पर्यावरण व आरोग्य विषयक उपक्रमाबद्दल कौतुक केले.यावेळी बोलताना ते म्हणाले की, अहमदपूर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तसेच त्यांच्या पालकांच्या आरोग्याची काळजी महात्मा फुले महाविद्यालय घेत आहे. खऱ्या अर्थाने महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व कर्मचारी सामाजिक बांधिलकी जोपासत आरोग्य सेवेचे कार्य करीत आहेत, असे ही ते म्हणाले. यावेळी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते आयुर्वेदाचार्य डॉ. प्रवीण बढे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत विकास आडागळे व शेख मुबारक हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मराठी विभागातील ज्येष्ठ प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, डॉ. सतीश ससाणे, डॉ. पांडुरंग चिलगर,डॉ. मारोती कसाब, डॉ. बी.के. मोरे, डॉ. अभिजीत मोरे, डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. डी.एन. माने, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ.सचिन गर्जे, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. संतोष पाटील, डॉ. मारोती कसाब, प्रा. ए.सी. आकडे, यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!