हिवताप निर्मूलनासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, डासोउत्पत्ती थांबवा – डॉ. शरद कुमार तेलगाणे
उदगीर (एल पी उगीले) सध्या हिवताप निर्मूलन करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप या आजाराचा प्रादुर्भाव टाळणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रथम डास उत्पन्न होणार नाहीत याची काळजी घ्यावी, कारण हिवताप या आजाराचा प्रादुर्भाव डासापासून होतो जागतिक स्तरावर गेल्या काही दशकापासून सुई तापावर मात करण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू केले गेले आहेत त्याची आठवण म्हणून जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा केला जातो. मात्र एक दिवस पाळून चालणार नाही, आपल्या परिसराची स्वच्छता आणि दास ज्या ठिकाणाहून निर्माण होतात ती डबके किंवा साचलेल्या पाण्याचे साठे स्वच्छ केले पाहिजेत, शासकीय पातळीवरून हिवतापावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत सरकारी यंत्रणेच्या प्रयत्नांबरोबरच जनतेचा सहभाग फार महत्त्वाचा आहे इतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य ही तितकेच महत्त्वाचे आहेत असे विचार उदगीर येथील ओम हॉस्पिटल व मॅटर्निटी होम ते संचालक तथा समाज प्रबोधनात्मक कीर्तनकार ह भ प स्त्री रग तज्ञ डॉ. शरदकुमार तेलगाने यांनी मांडले आहे.
जागतिक हिवताप निर्मूलन दिनाच्या निमित्ताने प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी नागरिकांना मलेरिया या आजाराबद्दल माहिती सांगितली. घरामध्ये असलेले सांडपाणी यांची पाहणी करून ज्या ठिकाणी डास अंडी घालणाऱ्या ठिकाणी आठवड्यातून एक दिवस तरी कोरडा दिवस पाळा आणि डास उत्पत्ती टाळा अशा पद्धतीचा संदेश त्यांनी दिला शक्य झाल्यास अशा डबक्यामध्ये अमित कीटकनाशक औषध टाकण्यात यावे, तसेच परिसर स्वच्छ राहील याची काळजी प्रत्येक नागरिकांनीही घ्यावी. केवळ नगरपरिषद किंवा प्रशासकीय यंत्रणाच स्वच्छतेची जबाबदारी घेईल असे नाही, स्वतःपासून प्रत्येक नागरिकांनी सुरू केल्यास निश्चितपणे समाज जागृती होऊ शकेल, परिणामतः साथीचे कोणतेही दूषित पाण्यामुळे किंवा पाण्यातून निर्माण होणाऱ्या कीटकजन्य रोगामुळे जे नुकसान होते ते टाळता येऊ शकेल.
प्रत्येक नागरिकांनी सामाजिक जबाबदारी ओळखून स्वच्छतेचा मूलमंत्र जपावा आणि हिवताप टाळण्यासाठी प्रयत्न करावे, असेही आवाहन डॉक्टर शरदकुमार तेलगाने यांनी केले.
