डॉ.हरिवंशराय बच्चन शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

डॉ.हरिवंशराय बच्चन शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

अहमदपूर ( गोविंद काळे) : येथील डॉ.हरिवंशराय बच्चन शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध कला सुंदर करून रसिकांची मने जिंकली. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली, इंग्लिश प्री प्रायमरी विभाग, एल ,के ,जी ,यु के, जी व प्राथमिक आणि उच्च प्राथमिक पहिली ते आठवीचा यामध्ये सहभाग होता.या कार्यक्रमाचे उद्घाटन. माजी राज्यमंत्री तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी केले.तर प्रमुख पाहुणे म्हणून अहमदपूर नगरीच्या माजी नगराध्यक्षा सौ.अश्विनीताई कासनाळे,प्रख्यात निवेदक,व्याख्याते प्रा.मारोती बुद्रुक पाटील,केंद्रप्रमुख नंदकुमार कोणाळे,डाॅ सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, मुख्याध्यापक अविनाश जाधव,सचिव प्रभाताई यादव तर संस्थेचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक व्यंकट भदाडेे यांची उपस्थिती होती.

यावेळी माझी राज्यमंत्री विनायकराव पाटील म्हणाले की या शाळेने विविध क्षेत्रात उंच भरारी घेतली असून शाळेचा नावलौकिक अहमदपूर मध्ये मिळविला आहे. यावेळी प्रा.मारोती बुद्रुक पाटील म्हणाले की शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास करण्यासाठी व विद्यार्थ्यावर योग्य संस्कार करून घेण्यासाठी इथल्या शाळेचे संचालक,सर्व शिक्षक प्रमाणिकपणे मेहनत घेऊन योग्य संस्कार करतात. यामुळेच या शाळेचे विद्यार्थी नावलौकिक मिळवत आहेत. या वर्षीक स्नेहसंमेलनामध्ये सांस्कृतिक,धार्मिक राष्ट्रीय प्रबोधन पर विविध नृत्य ,देशभक्तीपर गीते ,नाटक,गायन व्यक्तिमत्व स्पर्धा अशा कार्यक्रमाचे सादरीकरण प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम मुसळे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक वैशाली नागरगोजे यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगद जाधव,हरिनारायण साबदे,गोपाळ एल्पुरवाड,नारायण केरले,संदिप बोडके,रामेश्वर गादगे, रजनी बचाटे,अर्चना भदाडे,संध्या कांबळे इत्यादीनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!