मतदारसंघातील विविध प्रश्नांवर विधानसभेत आ. बाबासाहेब पाटील यांनी आवाज उठवला

मतदारसंघातील विविध प्रश्नांवर विधानसभेत आ. बाबासाहेब पाटील यांनी आवाज उठवला

अहमदपूर( गोविंद काळे )२०२३ -२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दृष्टीने मतदारसंघातील विविध प्रश्नांवर आमदार बाबासाहेब पाटील यांनी आवाज उठवला. अहमदपूर चाकूर मतदारसंघातील चाकूर तालुक्यातील नांदगाव एमआयडीसीसाठी मा.आदितीताई तटकरे यांनी मागील कालखंडामध्ये दोन बैठका घेऊन त्याला थोडीशी मदत केली होती. परंतु दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्या कामाची थोडीशी गती मंदावली आहे. पण मी आशावादी असल्यामुळे मा.मुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर छत्रपती संभाजी नगर आले असताना त्या ठिकाणी त्यांच्या भाषणांमधून उल्लेख केला की चाकूरच्या एमआयडीसीला आम्ही थोडीशी गती देणार आहोत ; म्हणून एमआयडीसीला जर गती दिली तर माझ्या मतदारसंघातील तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध होणार आहे.

माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील साहेबांनी जलसंपदा विभाग अंतर्गत असलेल्या कामांना मदत केली. सर्वे झाले असून डिझाईनसाठी नाशिक या ठिकाणी मण्यार नदीवरील नऊ बॅरेजेस प्रस्ताव त्या ठिकाणी आलेला आहे. जलसंपदा खात्याच्या मंत्री महोदयाला विनंती आहे की आमचा भाग हा दुष्काळ असल्यामुळे यालाही येणाऱ्या पुरवणी बजेटमध्ये निधी देऊन माझ्या मतदारसंघातील दुष्काळी भागाला न्याय देण्यात यावा. दोन तालुक्यांमध्ये ट्रॉमा केअर सेंटर 2009 मध्ये अहमदपूर तालुक्यात आपण मंजूर केलं होतं. पण त्या ठिकाणी आतापर्यंत त्याला काही इमारती झाल्या त्याच्यासाठी लागणार साहित्य आणि काही स्टाफ आवश्यक आहे, कारण सगळीकडे हायवे रस्ते झालेले आहेत. गाड्या वेगाने धावत असल्याने मोठे अपघात होत आहे. ज्या हेतून या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरला मंजुरी दिली, शासनाने हेतू सफल होत नाही. म्हणून दोन्हीही चाकूर आणि अहमदपूरच्या ट्रॉमा केअर सेंटरला निधी देऊन सहकार्य करावे.

अहमदपूर तालुक्यातील किनगाव तालुक्याच्या बरोबरीचं गाव आहे. त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य ग्रामीण रुग्णालय लागण्यासाठी जे काही इमारत आहे ते पूर्ण झालेली आहे. त्याच्यासाठी आपण शासनाने ग्रामीण रुग्णालय केलं तर आजूबाजूच्या गावांचा आरोग्याचा प्रश्न मिटणार आहे. अहमदपूर येथे जिल्हा न्यायालयाची कमतरता आहे. त्याच्या संदर्भात शासनाने आम्हाला संबंधित इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून काम सुरू होईल. आज महाराष्ट्र मधला जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे महावितरणचा.. चाकूर तालुका एवढा मोठा असताना त्या ठिकाणी 5 केवीएस चे ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता आहे. नवीन सबसेंटर उभा करावा लागणार आहेत. 210 चे काही नवीन प्रस्ताव त्या ठिकाणी आलेले आहेत. याबाबतही सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा. तालुके नवीन झाल्यामुळे चाकूर तालुक्यातील काही गाव उदगीर तालुक्यामधील पोलीस स्टेशनला जोडलेले आहे. कामासाठी खूप मोठी विसंगती आहे. त्या संदर्भामध्ये वाढवण्या गावांमधील पोलीस स्टेशनला जोडलेले गाव ते जर चाकूरला जोडले तर त्याच्यामुळे पोलिसांचा देखील तणाव कमी होणार आहे. जनतेला जो होणारा त्रास तालुका चाकूर आणि पोलीस स्टेशन वाढवणा त्याच्यामुळे तो देखील त्या ठिकाणी आपल्याला न्याय देऊन या जनतेला न्याय द्यावं अशी मागणी केली आहे. अहमदपूर तालुक्यामध्ये देखील आम्हाला पोलीस इमारतीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी निधी द्यावा अशा प्रकारची मागणी केली.

About The Author

error: Content is protected !!