भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप

लातूर (एल.पी.उगीले) : मुरुड येथील प्रभाग क्रमांक पाच अर्थात शिवाजीनगर मुरुड येथील 5 अंगणवाडी मध्ये बहुजन शिक्षण प्रसारक मंडळ, अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य सौ.श्रुती अविनाश सवाई, उपाध्यक्ष – कु. चैताली सुनील वाघमारे, सचिव – आयु.अविनाश गुंडुराव सवाई, साप्ताहिक तहसील चे संपादक – आयु.बाळासाहेब धर्मराज जाधव यांनी भारतरत्न विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी सविस्तर माहिती सांगून मार्गदर्शन केले. डॉ.बाबासाहेबांनी शिक्षणाकडे सर्वात जास्त महत्व दिले होते. ते म्हणतात की, जगामध्ये गरिबी तेथेच आहे, जिथे शिक्षण नाही, म्हणून अर्धी अर्धी भाकरी खा, पण आपल्या लेकरांना चांगले शिकवा, या उद्देशाने लेकरांना शिक्षणा पासून सुरुवात करुत म्हणून 200 पाट्या, व चॉकलेट देऊन हा छोटासा कार्यक्रम भीम जयंती निमित्त राबवला असल्याचे संयोजकांनी सांगितले. तसेच भिमक्रांती संघ संस्थापक अध्यक्ष आयु.जयदीप सुरवसे,यांनी आभार व्यक्त केले,तसेच बहुजन शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष सौ.श्रुती अविनाश सवाई – (ग्रा. पं सदस्य) यांचा सत्कार स्वामी मॅडम व त्यांच्या सहकारी यांनी केला. हा कार्यक्रम पार पाडण्यास विद्यार्थी आघाडी भाजपा शहर प्रमुख विशाल कणसे, श्रीकांत टिळक, मुद्रिका सवाई,तसेच अंगणवाडी स्वामी मॅडम, मदतनीस अजगरे मॅडम व त्यांच्या इतर सहकारी तसेच अंगणवाडीतील बालक, बालिका (विद्यार्थी) ,पालक वर्ग आदी उपस्थित होते.

About The Author