प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप
उदगीर (एल.पी.उगीले) : शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, तो जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. ती ताकत समाजातील गोरगरीब उपेक्षित कष्टकरी माणसाच्या मध्ये यावी. हा उदात्त हेतू ठेवून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा संकल्प करून, तो संकल्प सिद्धीला नेला आहे.
आपल्या भागातील गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून शैक्षणिक साहित्य देतानाच, त्यांच्यामध्ये सामाजिक,सांस्कृतिक, जाणीव प्रगल्भ व्हाव्यात. या उद्देशाने प्रहार जनशक्ती पक्ष ,उदगीर यांच्या वतीने महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त “दोन वही,एक पेन” या सामाजिक उपक्रमाअंतर्गत उदगीर शहरातील इंदिरा नगर येथील शाळेतील विद्यार्थ्यांसोबत शालेय पाठयपुस्तक वितरण करून महामानव डॉ बाबासाहेबांना मानवंदना देत वही व पेन ठेवून विचारांची आदरांजली देवून जयंती साजरी करण्यात आली,जनहितार्थ कार्य करण्याच्या हेतूने प्रहार जनशक्ती पक्ष पदाधिकाऱ्यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त समाजकार्याचे नवे नवे टप्पे गाठत असतानाच हाही संकल्प करण्यात आला आहे.
पक्षाच्या वतीने जनकल्यानकारी कार्य आपल्या हातून घडो हा संकल्प डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने प्रहार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला.या प्रसंगी जिल्हाप्रमुख-कांचन भोसगे, उपजिल्हाप्रमुख-प्रेमलता भंडे ,उपजिल्हाप्रमुख-विनोद तेलंगे,उदगीर तालुकाप्रमुख-रविकिरण बेळकुंदे,तालुका कार्याध्यक्ष- महादेव आपटे ,तालुका उपाध्यक्ष- महादेव मोतीपवळे,शहर कार्याध्यक्ष गणेश दावणे, सचिव-बालाजी बिरादार, तालुका सचिव अविनाश शिंदे, संपर्क प्रमुख सुनिल केंद्रे इत्यादी मान्यवरांसह इंदिरा नगर येथील गरजु विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.