आठ वर्षाच्या मुलाने धरला रोजा
उदगीर (एल.पी.उगीले) : इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिना सुरू असून या रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा करतात. आपल्या जीवनाचा पहिला रोजा (उपवास) पूर्ण करून चौबारा परिसरतील आठ वर्षेय सय्यद शहझान फयाज हा मुलगा जगाचा निर्माता अल्लाहप्रती आपल्या संवेदना व्यक्त केला. सध्याचे तापमान पाहता रखरखत्या उन्हात पहाटे पाच वाजेपासून सायंकाळी ६:४५ वाजेपर्यंत अन्नाचा एक कण आणि पाण्याचा एक घोट न घेता, दिवसभर उपाशी पोटी राहून त्यांनी अल्लाहप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. विशेष म्हणजे सय्यद शहझान फयाज या मुलाने रोजा (उपवास) करून आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या कुटुंबीय व नातेवाईकांनी त्याचे अभिनंदन केले.