सामाजिक वनिकरणातील भ्रष्टाचारास जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन प्रोत्साहन

सामाजिक वनिकरणातील भ्रष्टाचारास जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन प्रोत्साहन

शिरूर अनंतपाळ (गोविंद काळे ) : मौजे डोंंगरगाव (बोरी)ता.शिरुर अनंतपाळ जि.लातुर येथील रोपवाटिकेत भ्रष्टाचार झाला असे प्रतिपादन पदमाकर कांबळे यांनी केले आहे..
सन 2017 -18 या वर्षी सामाजिक वनिकरण कार्यालयाकडून मौजे डोंंगरगाव (बोरी) येथे दोन (2) रोपवाटिका कागदोपञी चालु करण्यात आल्या पण प्रत्यक्षात मात्र एकच चालु होती.व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हायटेक रोपवाटिका फक्त कागदोपञीच चालु होती पण मजुराकडुन दोन्ही रोपवाटिकेचे काम करुन घेवुन त्यांना त्या कामांची मजुरी न देता खोटे मजुर कामावर दाखवुन, काम न करणा-यास मजुरी देवुन भ्रष्टाचार केला आहे.
या प्रकरणात तक्रारदार यांनी गेली 2 वर्षापासून पाठपुरावा करीत असताना या प्रकरणात उपविभागीय अधिकारी (रोहयो) यांनी विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनिकरण, लातुर यांना अनेक वेळा पञ व्यवहार करुन संबंधित तक्रारीवरून तपास करून अहवाल सादर करण्यास कळविले पण विभागीय वन अधिकारी,सामाजिक वनिकरण, लातुर यांनी हा आदेश धुडकावून तपास केला नाही व अहवाल पण सादर केला नाही .या प्रकरणातील तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी कार्यालयातील तत्कालीन कर्मचारी,वनपाल सोनकांबळे,वरिष्ठ अधिकारी विभागीय वन अधिकारी,यांना हाताशी धरुन भ्रष्टाचार केला असुन 252 मजुर खोटे दाखवुन कांही मजुर तर एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या योजनेवर कामाला दाखवुन निधी वितरीत केला आहे या प्रकरणात मा.उपविभागीय अधिकारी (रोहयो)यांच्या दालनात अनेक वेळा सुनावण्या झाल्या त्या सुनावणी दरम्यान विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनिकरण, लातुर यांनी खोटे दस्तावेज देवुन प्रकरण दडपण्यासाठी पदाचा गैरवापर केला आहे व तक्रारदाची व प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे
या प्रकरणात तात्काळ कारवाई नाही झाल्यास मा.उच्च न्यायालयात सर्व अधिकाऱ्यां विरुध्द न्याय मागण्यात येईल असे तक्रारदार यांनी कळविले आहे.

About The Author