यशवंत विद्यालयाचा माजी विद्यार्थी बाशिदखान पठाण यांचा सत्कार संपन्न

यशवंत विद्यालयाचा माजी विद्यार्थी बाशिदखान पठाण यांचा सत्कार संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालयाचा माजी विद्यार्थी, अहमदपूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष, दैनिक देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी आणि बांधकाम ठेकेदार बासिद्खान पठाण यांना युरो रशियन युनिव्हर्सिटी, इन्स्टोनिया या विद्यापीठाच्या वतीने पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना मुंबई येथे एका विशेष सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मानपूर्वक पी.एच.डी ही पदवी प्रधान केल्याबद्दल त्यांचा यशवंत परिवाराच्या वतीने प्राचार्य व्ही. व्ही. गंपले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि बुके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी उप मुख्याध्यापक उमाकांत नरडेले, पर्यवेक्षक दिलीप गुळवे, गजानन शिंदे,महात्मा बसवेश्वर पुरस्कार विजेते राम तत्तापुरे, कोटा पॅटर्नचे खयुम्म शेख, प्रा. रवी ईरफळे, अरुण मोरे, संतोष मालवदे, विवेकानंद हुडे,बालाजी सोनटक्के, राजकुमार बोराळकर, गौरव चौंडा यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी तर आभार कपिल बिराजदार यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!