डॉ बळीराम पवार यांनी केला समीक्षा कांबळे व कोमल पोलेचा सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी कु. समीक्षा कांबळे व कु.कोमल पोले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या उन्हाळी २०२२ च्या बी ए पदवी परीक्षेत अनुक्रमे प्रथम व सर्व तृतीय बद्दल किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.बळीराम पवार यांनी यशस्वी विद्यार्थीनींचा सत्कार करून अभिनंदन केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.बळीराम पवार हे एक समाजाभिमुख व्यक्तिमत्व असून आपले सामाजिकदायित्व समजून नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २००९ पासून प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गुणवत्तेसह क्षेत्रामध्ये महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या उन्हाळी २०२२ परीक्षेत कु. समीक्षा शेषेराव कांबळे, ९२.०९ % गुण घेऊन विद्यार्थ्यास सर्वप्रथम तसेच ऐच्छिक इंग्रजी विषयांमध्ये प्रथम आल्याबद्दल व कु.कोमल संभाजी पोले या विद्यार्थीनींने ९०.०३% गुण मिळवून ही कला शाखेत विद्यापीठात सर्व तृतीय येण्याचा तसेच संस्कृत विषयांमध्ये विद्यापीठातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला. याबद्दल प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्या उपस्थितीत डॉ. बळीराम पवार यांनी यशस्वी विद्यार्थीनींचे सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी ,समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे, संस्कृत विभागप्रमुख डॉ. प्रशांत बिरादार, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.अतिश आकडे, भूगोल विभाग प्रमुख डॉ.डी. एन. माने यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.