संत ज्ञानेश्वर विद्यालयात सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा संपन्न

संत ज्ञानेश्वर विद्यालयात सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा संपन्न
संत ज्ञानेश्वर विद्यालयात सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा संपन्न

अहमदपूर ( गोविंद काळे )येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात दिनांक 17 व 18 एप्रिल 2023 रोजी दोन दिवसीय शिक्षकांची सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष गणेश दादा हाके पाटील होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून रामराव मार्तंडराव कुलकर्णी,प्रमुख पाहुणे म्हणून राज्य आदर्श शिक्षक देवेंद्र देवणीकर, संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक उद्धव शृंगारे सह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यशाळेची सुरुवात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली.तद्नंतर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक यांचा शाल पुष्पहार देऊन संस्थाध्यक्ष गणेश दादा हाके पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर हस्ताक्षर कार्यशाळेचे मार्गदर्शक रामराव कुलकर्णी यांनी अक्षरांचे अवयव, वळणदार स्वर व व्यंजने कशी लिहावीत ,सुंदर हस्ताक्षरावरून माणसाचा स्वभाव समजतो असे कुलकर्णी गुरुजी म्हणाले. शब्द वाक्य कशी लिहावीत याची विविध उदाहरणे देऊन कार्यशाळा संपन्न झाली .यावेळी सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेचे अध्यक्ष गणेश दादा हाके पाटील यांनी या कार्यशाळेस आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर देवेंद्र देवणीकर गुरुजी यांनी श्रवण, भाषण, वाचन, लेखन यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले.
सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अशा रोडगे यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले व आभार मीना तोवर यांनी मांनले.

About The Author