सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन..

सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन..
अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील रुद्धा येथील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल, रुद्धा येथे दि. २९/०६/२०२३ रोजी आषाढी एकादशी निमित्त संस्थेचा सचिव तथा प्रदेश सरचिटणीस भाजपा महिला मोर्चा यांच्या प्रमुख उपस्थितीत विठ्ठल -रुक्मिणी च्या प्रतिमेचे पूजन करून वंदन करण्यात आले.

यंदा आषाढी एकादशीदिवशीच बकरी ईद साजरी केली. अशा परिस्थितीत हिंदू-मुस्लिम एकतेचे अनोखे उदाहरण पाहायला मिळालं आहे.येथे बकरी ईद व आषाढी एकादशी उत्साहात साजरी करुन शाळेनी धार्मिक ऐक्याचे दर्शन घडविले. शाळेत सकाळी मुस्लिम विद्यार्थ्यांनी ईदची नमाज पठण तर हिंदू विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी विधीवत पूजा पार पडली. नमाज व पूजेनंतर एकत्र आलेल्या हिंदू-मुस्लिम विध्यार्थ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेमध्ये बाल वारकर्‍यांच्या दिंडीचे स्वागत करण्यात आले.विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढली होती. डोक्यावर टोपी, पायजमा, बंडी या पोशाखात लहान मुले तर रंगीबेरेंगी साड्या परिधान करुन डोक्यावर तुलस घेऊन मुली सहभागी झाल्या होत्या. हातात भगवे ध्वज, टाळ-मृदूंगचा निनाद, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष केला. विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभुषेत सहभागी झालेले विद्यार्थी या दिंडीचे आकर्षण ठरले.
यावेळी संचालक कुलदीप हाके व संचालिका सौ. शिवालिका कुलदीप हाके यांची उपस्थिती होती. तसेच संगीत शिक्षक हनुमान राऊत व ६ वी वर्गातील विद्यार्थिनी कु. अनुराधा राऊत यांनी अभंग सादर केले. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. यानंतर श्री विठ्ठलाच्या आरतीने कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमासाठी प्राचार्या रुथ चक्रनारायण, शिक्षक गणेश कोईलवाड, आनंद कांबळे, संभाजी सांगळे, मोसिन शेख, इंद्रजीत ढमामे, हीना कल्लुरकर, अंजली पोतदार, स्नेहा ओझा, ज्योत्सना स्वामी, अस्मा शेख, रेणुका सूर्यवंशी, राजश्री पांचाळ व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.

About The Author