रुक्‍मीनबाई चामे यांचे दुखद निधन.

रुक्‍मीनबाई चामे यांचे दुखद निधन.
 अहमदपूर( प्रतिनिधि ) तालुक्यातील चिखली येथील जेष्ठ महिला रुक्मिणीबाई निवृत्तीराव चामे यांचे दिनांक 30 रोज शुक्रवारी सकाळी सात वाजता वयाच्या शंभराव्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले.
 त्यांच्यावर दि. 30 रोज शुक्रवारी सायंकाळी चार वाजता चिखली येथील रेड्डी स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले.
त्यांच्या पक्षात सहा मुले, तीन मुली, सुना, नातू, पणतू असा मोठा परिवार असून ग्रामपंचायत सदस्य सुरेश चामे आणि परभणी जिल्हा शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष विजयकुमार चामे यांच्या त्या मातोश्री होत.
 त्यांच्या दुखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About The Author

error: Content is protected !!