पंढरीच्या वारी एवढीच अडचणीतील शेतकऱ्यांसाठी मदतवारी महत्वाची..डॉ नरसिंह भिकाणे

पंढरीच्या वारी एवढीच अडचणीतील शेतकऱ्यांसाठी मदतवारी महत्वाची..डॉ नरसिंह भिकाणे

अहमदपूर( गोविंद काळे ) आषाढीला जेवढी पंढरपूरची वारी पुण्यप्रद आहे तेवढीच पावसाळ्याच्या तोंडावर अडचणीतील बळीराजासाठी “शेतकरी मदतवारी” ही महत्त्वाची आहे असे मत अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथे मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी आषाढी एकादशी दिवशी घेतलेल्या मोफत खत वाटप कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूराव पलमटे होते तर व्यासपीठावर सूर्यकांत सूर्यवंशी,मनसे तालुकाउपाध्यक्ष उत्तम पाटील उपस्थित होते.यावेळी बोलताना डॉ भिकाणे यांनी गतवर्षी याच मोसमात आपण मनसे मदत अभियान अंतर्गत 12 शेतकऱ्यांना प्रत्येकी 11 हजाराची मदत केल्याची आठवण करून देत ह्याही वर्षी अडचणीतील शेतकऱ्यांना मोफत खत वा बीबीयाने वा आर्थिक सहाय्य “मनसे मदत अभियान” अंतर्गत करत असल्याचे सांगितले.
[या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष डॉ भिकाणे यांनी अडचणीतील दहा शेतकऱ्यांना मोफत 20/20/0 या प्रकारच्या खताचे वाटप केले] कार्यक्रमाचे प्रास्ताविकसूर्यकांत सूर्यवंशी यांनी केले तर आभारप्रदर्शन गोविंद भिकाणे यांनी केले.या वेळी डॉ भिकाणे यांच्या हस्ते शांताबाई जाधव,अप्पाराव आचार्य,श्रीधर स्वामी,मंचक सूर्यवंशी,सतीश कदम,पठाण लातीब,गोविंद बने,अशोक कासले,सोपान कोलवाड,रावसाहेब मंदाडे या दहा शेतकऱ्यांना खत पोते वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेअरमन मदन पलमटे,मनवीसे तालुकाध्यक्ष अतिष गायकवाड,राजकुमार कंदे,शिवाजी हमणे, शिवराज कासले,अजय मलवाड, बशीर पठाण,सदाशिव पिटाळे, ज्ञानेश्वर कासले आदींनी परिश्रम घेतले.

About The Author